उस्मानाबाद जिल्ह्यात अपहरण ,लैंगिक अत्याचार आदी गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

तामलवाडी  : पिंपळा (खु.), ता. तुळजापूर येथील ओमराजे रामलिंग भोसले हा 14 वर्षीय मुलगा दि. 14.12.2021 रोजी 14.00 वा. सु. “मी क्रीकेट खेळायला जात आहे.” असे कुटूंबीयांस सांगून घराबाहेर पडला परंतु उशीरापर्यंत घरी न परतल्याने कुटूंबीयांनी त्याचा परिसरात, नातेवाईकांकडे शोध घेतला असता काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावर त्याचे कोण्या अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या आई- हेमा रामलिंग भोसले यांनी दि. 15 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 लैंगीक अत्याचार

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील एक 17 वर्षीय मुलगी सोलापूर येथील रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली होती. तीच्या वयाबाबत रुग्णालय प्रशासनास संशय आल्याने त्यांनी खातरजमा केली असता तीचे वय 17 वर्षे असल्याचे निष्पन्न होउन तीचा बाल विवाह होउन तीच्यावर लैंगीक अत्याचार झाल्याचे समजले. यावरुन तीचा पती व सासु यांच्याविरुध्द सोलापूर शहरातील एका पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 376, 34 आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचे घटनास्थळ हे उस्मानाबाद जिल्हा हद्दीत असल्याने पुढील तपासास तो गुन्हा उस्मानाबाद जिल्‌ह्यातील एका पोलीस ठाण्यास प्राप्त झाला आहे

धोकादायकपणे ज्वलनशील द्रव बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

येरमाळा  : येरमाळा येथील माउली उत्तम गरड यांनी दि. 15.12.2021 रोजी 11.30 वा. सु. गावातील आपल्या ‘वॉशिंग सेंटर’ मध्ये 8 लि. पेट्रोल हे ज्वलनशिल द्रव जिवीतास धोकादायक असल्याचे माहित असतांनाही बाळगून भा.दं.सं. कलम- 285 उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web