उस्मानाबाद जिल्ह्यात अपहरण, जाळपोळ, मारहाण आदी गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

उमरगा : उमरगा येथील श्रीपाद दुर्गादास जाधव हा 13 वर्षीय मुलगा दि. 21.10.2021 रोजी घरुन बेपत्ता झाला. यावरुन त्याचे अज्ञात कारणासाठी कोण्या अज्ञाताने अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या आई सुमीत्रा जाधव यांनी दि. 25.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जाळपोळ

तुळजापूर  : हंगरगा (तुळ) येथील हरीश्चंद्र नन्नवरे यांच्या शेतातील कापनी केलेल्या सोयाबीन पिकाचा ढिग दि. 24.10.2021 रोजी 20.30 वा. सु. आगीत जळाल्याने त्यांचे सुमारे 1,00,000 ₹ चे आर्थिक नुकसान झाले. ही आग ग्रामस्थ- आकाश चौगुले व अजय काळे यांनी जाणीवपुर्वक लावली असावी अशा मजकुराच्या रविंद्द हरीश्चंद्र नन्नवरे यांनी दि. 25.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाण 

लोहारा  : फणेपूर, ता. लोहारा येथील खंडू निंगशेट्टी हे दि. 25.10.2021 रोजी 11.00 वा. शेतातील झाडाखाली झोपले होते. यावेळी त्यांचा मुलगा- ईश्वर वय 29 वर्षे याने त्यांना झोपेतून उठवून 10 एकर शेतजमीन आपल्या नावे करण्याचा तगादा लावून, शिवीगाळ करुन खंडू यांच्या डोक्यात दगड फेकून मारल्याने ते जखमी झाले. अशा मजकुराच्या खंडू यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                           

From around the web