उस्मानाबाद जिल्ह्यात अपहरण , विनयभंग , मारहाण आदी गुन्हे दाखल 

 
Osmanabad police
अपहरण 

उस्मानाबाद  : उस्मानाबाद तालुक्यातील एक कुटूंब दि. 20.11.2021 रोजी रात्री घरात झोपले ह होते.दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहता त्यांच्या लक्षात आले की, आपली 17 वर्षीय मुलगी बिछाण्यात नसून तीच्या जागी  टेडी बीअर बाहुला ठेऊन त्यावर पांघरून घातलेले आहे. यावर कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता सांगली जिल्ह्यातील एका तरुणाने फुस लाउन तीचे अपहरन केले असल्याचे त्यांना समजले. अशा मजकुराच्या मुलीच्या आईने दि. 24 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
विनयभंग 

परंडा  : परंडा तालुक्यातील एका पुरुषाने मोटारसायकलने जाणाऱ्या गावातीलच 46 वर्षीय महिलेचा (नाव- गाव गोपनीय) दि. 23.11.2021 रोजी 09.15 वा. मो.सा. वरुन त्या महिलेचा पाठलाग करुन, “तु मला आवडतेस, तु माझ्यावर प्रेम कर, तु माझ्या सोबत चल आपण फिरायला जाउ.” अशा स्वरुपाचे वक्तव्य करुन तीच्या मनास लज्जा निर्माण करुन तीचा विनयभंग केला. यावर तीने त्यास खडसावले असता त्याने तीला शिवीगाळ करुन घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दि. 24 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

ढोकी  : तावरसखेडा, ता. उस्मानाबाद येथील सरस्वती शक्ती गवळी या पतीस माहिती न देता  दुकानात गेल्या होत्या. या कारणावरुन दि. 23.11.2021 रोजी 23.30 वा. सु. सरस्वती यांना पती- शक्ती यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्या व दगड हातापायावर मारुन त्यांस जखमी केले तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सरस्वती गवळी यांनी दि. 24 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                           

From around the web