रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
उमरगा : शिंदे गल्ली, उमरगा येथील- देवानंद गुरव, तर जवळगा बेट, उमरगा येथील- लक्ष्मण कोळनुरे, तर तुरोरी, ता. उमरगा येथील- संतोष जाधव या तीघांनी दि. 29.01.2023 रोजी 13.50 ते 19.45 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ऑटो रिक्षा क्र. एम.एच. 25 बी 5266, ॲटो रिक्षा क्र. एम.एच. 25 ए के. 0852 व ऑटो रिक्षा क्र. एम.एच. 25 एम 1127 ही वाहने उमरगा येथील वेगवेगळ्या तीन ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना आढळले.
बेंबळी : करजखेडा,ता.उस्मानाबाद येथील- अशोक आदटराव यांनी याच दिवशी 12.00 वा. सु. महिंद्रा मॅक्सीमो क्र. एम.एच. 13 बी.एन 3628 हा करजखेडा चौकात सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना बेबंळी पोलीसांना आढळले.
नळदुर्ग : उजणी, ता.औसा येथील- प्रदिप कागे यांनी याच दिवशी 20.45 वा. सु. टॅम्पो क्र. एम.एच. 24 एयु 0198 हा नळदुर्ग बसस्थानक समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना नळदुर्ग पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत संबधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.
हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल
बेंबळी : मार्डी, ता. लोहारा येथील- महेबुब शेख, नागेश चव्हाण यांनी दि. 29.01.2023 रोजी 13.00 ते 14.00 वा. सु. आपापल्या ताब्यातील मॅक्सीमो क्रं. एम.एच.25 बीएन 2183, मॅक्सीमो क्रं. एम.एच.13 बी.एन. 0310 हे करजखेडा चौकात सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना बेबंळी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
कळंब : डिकसळ, कळंब येथील- शाकीर फकीर खान पठाण यांनी दि.29.01.2023 रोजी 19.45 वा.सु. मोटरसायकल क्र.एम.एच.25 ए.आर. 2015 ही पुष्पक कलेक्शन ढोकी रस्त्यावर कळंब येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.