सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्या 9 व्यक्तींविरुध्द गुन्हे दाखल
उस्मानाबाद : उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 10.12.2021 रोजी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या, वाहतुक करणाऱ्या, निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्या तसेच कोविड- 19 मनाई आदेशांचे उल्लंघन इत्यादी प्रकरणी 9 कारवाया करुन संबंधीत पोलीस ठाण्यात 9 व्यक्तींविरुध्द खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.
यात सार्वजनिक ठिकाणी हातगाडे, हॉटेलमध्ये धोकादायकपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उमरगा पो.ठा.- 1, उस्मानाबाद (ग्रा.)- 2 व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत. तर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्यांविध्द उमरगा पो.ठा.- 2, परंडा- 3 व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत. तसेच कोविड-19 संदर्भाने जारी असलेल्या प्रशासनाच्या मनाई आदेशाचे भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत उल्लंघन करुन करुन टपरीमध्ये तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर वाशी पो.ठा. येथे 1 गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
ढोकी : दुधगाव, ता. उस्मानाबाद येथील वनमाला राजेंद्र चव्हाण, वय 55 वर्षे या दि. 08.12.2021 रोजी 16.00 वा. सु. आपल्या गट क्र. 266 मधील शेतात होत्या. यावेळी नातेवाईक- रविंद्र गणपती चव्हाण, सुहास चव्हाण व छाया चव्हाण या तीघांनी शेतातुन रहदारी करण्याच्या व शेत मोजणीच्या कारणावरुन वनमाला चव्हाण यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या वनमाला चव्हाण यांनी दि. 10 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.