सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्या 21 व्यक्तींविरुध्द गुन्हे दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद  - सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या, वाहतुक करणाऱ्या, निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्या अशा प्रकरणी उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 21.01.2022 रोजी 21 कारवाया करुन संबंधीत पोलीस ठाण्यात 21 व्यक्तींविरुध्द खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.

यात सार्वजनिक ठिकाणी हातगाडे, हॉटेलमध्ये धोकादायकपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द भुम पो.ठा.- 2, अंबी- 2, नळदुर्ग- 1, कळंब- 1, परंडा- 2 व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत. तसेच सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्यांविध्द उमरगा पो.ठा.- 3, आनंदनगर- 4, मुरुम- 3 व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत. तर

उस्मानाबाद (ग्रा.)- 8, वाशी- 3, भुम- 3, नळदुर्ग- 4, शिराढोन- 2, कळंब- 4, येरमाळा- 1, परंडा- 1, उमरगा- 4 व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत. तर सार्वजनिक रस्त्यावर जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपने, भरधाववेगात वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द तामलवाडी पो.ठा.- 1, कळंब पो.ठा.-2 व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत.

 
सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्या तीघांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद -  खामसवाडी, ता. उस्मानाबादयेथील शिवहारी भोसले यांनी दि. 20.01.2022 रोजी 15.00 वा. सु. केशेगाव येथील सार्वजनिक रस्त्यावर आपल्या ताब्यातील ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 25 एन 609 हा रहदारीस धोकादायकपने उभा केला असतांना बेंबळी पोलीसांना आढळले.

 एकुरगा, ता. उमरगा येथील बळीराम कांबळे यांनी 16.30 वा. सु. उमरगा येथील सार्वजनिक रस्त्यावर आपल्या ताब्यातील वाहन रहदारीस धोकादायकपने उभा केला असतांना तर गुंजोटी रोड, उमरगा येथील शुभम युवराज स्वामी हे 17.00 वा. सु. उमरगा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 च्या बाजूस आपल्या हातगाड्यावरील गॅस शेगडीवर धोकादायकपने अग्नि प्रज्वलीत करत असतांना उमरगा पोलीसांना आढळले.

यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द 283 अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

लोहारा - शिंगोली, ता. उस्मानाबाद येथील रितेश अंकुश वाघमारे, वय 21 वर्षे हे दि. 21.01.2022 रोजी 20.00 वा. सु. लोहारा शहरातील छ. शिवाजी महाराज चौक परिसरात येणाऱ्याजाणाऱ्या लोकांना मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करुन तसेच आरडाओरड करुन सार्वजनिक शांतता भंग करत असतांना लोहारा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 504, 506 सह महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 85 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web