उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, जाळपोळ, अपघात आदी गुन्ह्याची नोंद 

 
Osmanabad police
चोरी 

तुळजापुर : अक्षय गुजर , रा. गुजर गल्ली ,उस्मानाबाद यांनी तुळजापुर येथील जुन्या बस स्थानकात  ठेवलेली होंडा शाईन मोटार सायकल क्रं. एम.एच.24 बी.बी. 2849 दि. 19 सप्टेंबर रोजी 19.30 वा. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या गुजर यांनी दि. 03 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
जाळपोळ

भूम   : भवानवाडी येथील बापु अर्जुन यांच्या शेतातील कापणी करुन ढिग लावलेले सुमारे 70-80 क्वींटल सोयाबीन पिक व ठिबक सिंचन नळया असे साहित्य अज्ञात व्यक्तीने दि.02 व 03  आक्टोबर रोजी दरम्यानच्या रात्री  अज्ञाताने जाळुन अर्जुन यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान केले. अशा मजकुराच्या अर्जुन यांनी दि. 03 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात

लोहारा  : जेवळी (उ)येथील नेताजी दुधभाते हे कांक्रबा येथील आपली मावशी सिंधुबाई कोरे,वय-55 वर्ष यांना दि.01 आक्टोबर रोजी मोटार सायकलवरुन घेऊन जात होते. दरम्यान हिप्परगा (स) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर एका बसने हुनकावणी दिल्याने दुधभाते यांचे नियंत्रण सुटुन मोटार सायकल घसरुन पडली. या अपघातात सिंधुबाई कोरे या जखमी होऊन मयत झाल्या.अशा मजकुराच्या नेताजी दुधभाते यांनी दि. 03 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279,304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web