धाराशिवमध्ये गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल 

 
crime

धाराशिव  :  गोमांससाठी गोमातेची निर्दयी वाहतूक करणारा आयशर टेम्पो गोरक्षक दलाने पकडला होता. टेम्पो पकडताच वरुडा  रस्त्यावर दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. त्यात  दोन जखमी झाले होते. याप्रकरणी एका गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. 

आरोपी नामे- 1)अशितोष रविंद्र कदम, वय 23, रा. तेर जि. उस्मानाबाद यांनी गायी वाहतुक करण्याचे कारणावरुन दि.24.08.2023 रोजी 04.15 वा. सु. तेर ते उस्मानाबाद रोडवर शिंदे महाविद्यालय समोर फिर्यादी नामे- यासीर बशीर सय्यद, वय 30 वर्षे, रा. रुईभर ता. जि. उस्मानाबाद यांचा आयशार टॅम्पो क्र एमएच 46 ई 0660 मध्ये गाई भरुन घेवूनजात असताना यातील आरोपीने वाटेत आडवून तु या गाई कोठे नेत आहेस असे म्हणाला असता फिर्यादी म्हणाला  की माझा जनावराचा व्यापार असुन विक्री साठी नेत आहे. तु गायी कापण्यासाठी नेत आहेस असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या यासीर सय्यद यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 341, 504, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


हाणामारीचे अन्य गुन्हे दाखल 


नळदुर्ग : आरोपी नामे-1) बालाजी किसन सुरवसे, 2) लक्ष्मण किसन सुरवसे, 3) अशोक महादेव खोखडे, 4) मारुती एकनाथ सुरवसे सर्व रा.खुदावाडी 5)सोपान हरी सावंत, 6)गोविंद दोघे रा. चुंगी 7) डाकु दिलीप गायकवाड, रा. खानापूर यांनी मागील भांडणाच्या कारणावरून दि.23.08.2023 रोजी 21.30 वा.सु. घोडके तांडा येथील फिर्यादीचे शेतातील घरात ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी नामे- सुनिल नवनाथ दुधभाते, वय 34 वर्षे, रा.घोडके तांडा खुदावाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना व त्यांचे वडील यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, जम्या, तलवार, मिर्चीपुड घेवून जिव घेणा हल्ला करुन डोक्यात हातावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच यावेळी सुनिल यांच्या बचावास आलेल्या त्यांची पत्नीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या सुनिल दुधभाते यांनी दि. 24.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 307, 452, 323, 143, 147, 148, 149 सह 4/ 25 आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
परंडा  : दि.21.08.2023 रोजी 17.45वा. सु. बाजीराव धाब्याजवळ खानापुर शिवारात  फिर्यादी नामे- सद्दाम रहीम शेख, वय 31 वर्षे, रा. कुक्कडगाव, ता. परंडा जि. उस्मानाबाद व त्यांचे मित्र महेबुब शेख यांचे मोटरसायकलला कट मारुन अनोळखी चार आरोपीतांनी संगणमत करुन रस्त्यात आढवून शिवीगाळकरुन मारहान केली होती. दरम्यान यातील फिर्यादीने भांडण मिटवले असता नंतर सोनारी गावातील सहा आनोळखी इसमापैकी  आरोपी नामे- रंजीत इटकर याने फिर्यादी यांचा मित्र महेबुब यास काठीनेमारहान करुन जखमी केले. तसेच फिर्यादी हे महेबुब यांचे बचावास गेले असता त्यासही काठीने मनगटवार मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी सद्दाम शेख यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आरोपी नामे- रंजीत इटकर व आनोळखी 9 इसम यांचेविरुध्द परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 341, 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : आरोपी नामे-1)बब्बु महंमद शरीफ कुरेशी, 2) अमजद गणी कुरेशी, 3) शहानवाज गणी कुरेशी, 4) अलीशाद कुरेशी, 5) गौस अलीशद कुरेशी, 6) अफजल मंजुर कुरेशी 7) इमरान गणी कुरेशी, 8) अलीशान हरुन कुरेशी, 9) लतीब कुरेशी, 10) महंमद हुसेन कुरेशी, 11) शहाबाज इस्माईल कुरेशी, 12) अरबाज ईस्माईल कुरेशी सर्व रा. कुरेशी गल्ली,  ता. परंडा जि. उस्मानाबाद यांनी दि.24.08.2023 रोजी 08.45 वा. सु. कुरेशी गल्ली परंडा येथे फिर्यादी नामे- अशपाक समद कुरेशी, वय 35 वर्षे रा. कुरेशी गल्ली, ता. परंडा जि. उस्मानाबाद हे आरोपातांना आमचे घरासमोरील गटरीचे सांडपाणी का अडवले याबाबत विचारणा केली असता नमुद आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फियादीस व त्यांचे भाउ बशीर समद कुरेशी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी काठीने मारहान करुन जखमी केले. तुम्ही जर पोलीस केस केली तर तुम्हाला जिवे मारुन टाकु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या अशपाक कुरेशी यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : आरोपी नामे- 1)आशपाक समद कुरेशी,2) बशीर समद कुरेशी, 3) अलताफ समद कुरेशी, 4) अरबाज बशीर कुरेशी,5 ) सज्जाद बशीर कुरेशी, 6)अल्फेश बशीर कुरेशी, 7) अविज बशीर कुरेशी, 8) अफताब उर्फ अत्तु बशीर कुरेशी, 9) इकरान निसार कुरेशी, 10) नजिप नशिर कुरेशी, 11) बबलु जब्बार कुरेशी, सर्व रा. कुह्राड गल्ली, परंडा जि. उस्मानाबाद यांनी गटारीचे पाण्याचे कारणावरुन दि.24.08.2023 रोजी 08.30 वा. सु. कुह्राड गल्ली दर्गा रोड परंडा येथे फिर्यादी नामे- मोसीन दस्तीगर कुरेशी, वय 30 वर्षे, रा. कुह्राड गल्ली, परंडा जि. उस्मानाबाद यांना संडासबाथरुमाचे गटरीत सोडल्याने घाण वास येत आहे त्यामुळे लहान मुले आजारी पडत आहेत असे विचारले असता  यातील आरोपीनी शिवीगाळ करुन2 ते 11यांना फोन करुन बोलावून घेवून फिर्यादी व फिर्यादीचे चुलत भाउ अलिशान व सर्फराज यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली.याने लाकडी दांडक्याने हातावर, पायावर मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या मोसीन कुरेशी यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो.ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : आरोपी नामे- 1)रोहीत कल्याण साळवे,2)शुभम कल्याण साळवे, भिमनगर कळंब जि. उस्मानाबाद 3) पप्पु यांनी दि.24.08.2023 रोजी 12.30 वा. सु. चोंदे देशी दारु दुकान कळंबच्या बाजूला कळंब येथे फिर्यादी नामे-लहु बळीराम वाघमारे, वय 45वर्षे, रा. डिकसल, ता. कळंब जि. उस्मानाबाद, यांना विनाकारण पाठीमागून येवून दगडाने ढोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या लहु वाघमारे यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : आरोपी नामे- 1)नवनाथ दुधभाते,2)सुनिल नवनाथ दुधभाते, दोघे रा. खुदावाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि.23.08.2023 रोजी 18.00 वा. सु. नवनाथ दुधभते खुदवाडी यांचे घराजवळ  फिर्यादी नामे- लक्ष्मण किसन सुरवसे, वय 26 वर्षे, रा. खुदवाडी, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद, यांना आरोपी यांनी मला पाहून शिव्या का देतो असे म्हणून शिवीगाळ करुन दगडाने डाव्या दंडावर मारुन मुक्कामार दिली.फिर्यादीचा भाचा बालाजी गायकवाड व भाउ बालाजी सुरवसे यांना हातावर काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या लक्ष्मण सुरवसे यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : आरोपी नामे- 1)संदीप सुभाष शिंदे,2)सचिन प्रभाकर शिंदे,3) प्रभाकर मुर्लिधर शिंदे 4) सुभाष मुर्लिधर शिंदे सर्व रा. बेलवाडी ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांनी मागील भांडणाच्या कारणावरुन दि.24.08.2023 रोजी 04.15 वा. सु. गावातील मसोबा मंदीरासमोरील बेलवाडी येथे फिर्यादी नामे- ज्योती विजय गुळवे, वयलवाडी, ता. लोहारा जि. उस्मानाबाद, यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने, बतईने मारहान केली. अशा मजकुराच्या ज्योती गुळवे यांनी दि.24.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web