पानगावजवळ मोटरसायकलला कंटेनरची धडक, एक ठार 

 
crime

येरमाळा  : अंबाजोगाई  जि. बीड येथील- सुहास नानाभाऊ घाडगे, हे मोटरसायकल क्र एम एच 44 आर 0497 वरुन दि.12.05.2023 रोजी 13.00 वा दरम्यान येरमाळा जवळील पानगाव येथुन जात होत. दरम्यान कंटेनर क्र एमएच 10 एडब्ल्यु 8133 च्या चालकाने त्याचे ताब्यातील कंटेनर हा हायगई व निष्काळजीपणे चालवल्याने सुहास यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. 

या आपघातात सुहास  हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची सासरे- अनिल प्रल्हाद नांदे, रा. बावची, ता. केज यांनी दि.16.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो वा का. क 134 अ ब अंतर्गत गुन्हा नोंदवला 

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

भूम  : वालवड, ता. भुम येथील-जावेद मकबुल शेख यांनी दि. 16.05.2023 रोजी 17.00 वा. सु. आपल्या ताब्यातील टमटम  क्र. एम.एच. 23 सी 7830 हे वालवड बसस्थानक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना भुम पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत भुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा पोलीस ठाणे : तेरखेडा, ता. वाशी येथील-संदेश सोमनाथ चव्हाण यांनी दि. 15.05.2023 रोजी 11.30 ते 11.45 वा. सु. आपल्या ताब्यातील  पत्राशेड मध्ये  लोकाचे जिवीतास धोका उत्पन होईल असे फटाक्याने ज्वालाग्राही कच्चा मालाचे साठवणुक केलेली येरमाळा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 नळदुर्ग : रहिमनगर, नळदुर्ग ग्रामस्थ- आयुब कुरेशी, तर लोहगाव, ता. तुळजापूर येथील- आकाश मेंडके, तर व्यासनगर , नळदुर्ग येथील- अमोल मेंडके या तिघांनी  दि.16.05.2023 रोजी 17.30 ते 19.00 वा. सु. नळदुर्ग बसस्थानक येथे रस्त्यालगत आपआपल्या हातगाड्यावरील गॅस शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पो.ठा. येथे  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web