कळंब : टमटम पलटी होऊन एक ठार 

 
crime

कळंब  :आरोपी नामे- पद्याकर धर्मराज चव्हाण, वय 36 वर्षे, रा.एकुरगा हा.मु. लोहाटा पुर्व ता. कळंब हे दि.23.08.2023 रोजी 21.30 वा. सु. कळंब ते तांदुळवाडी रोड होळकर चौक जवळ जुन्या अश्विनी व्हिडीओ समोर कळंब येथुन टमटम क्र एमएच 25 एम 1663 समोरुन जात होते. 

दरम्यान पद्याकर चव्हाण यांनी त्यांचे ताब्यातील टमटम हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून रस्त्यावरील खड्डा चुकवत असताना नमुद टमटम पल्टी होवून पद्याकर चव्हाण यांचे छातीवर पडून ते गंभीर जखमी होवून स्व:ता मयत झाले अशा मजकुराच्या फिर्यादी- उमेश जिजाब सावंत, वय 42 वर्षे, रा. समतानगर पुनर्वसन सावरगाव कळंब ता. कळंब जि. उस्मानाबाद यांनी दि.27.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम  184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.              

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

उमरगा  : आरोपी नामे-1) ईस्माईल करीम सय्यद, वय 40  वर्षे, रा. बसवकल्याण ता. बसवकल्याण जि. बिदर यांनी दि. 26.08.2023 रोजी 19.45 वा. सु. आपल्या ताब्यातील आयशर कंटनेर क्र टी एस 15 युडी 0114 हा सोलापूर ते हैद्राबाद रोडवरील अत्तार यांचे पेट्रोलपंपा समोर रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 (1) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

 रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 आंबी  : आरोपी नामे-1) शिवाजी लक्ष्मण कदम, वय 21 वर्षे रा. चिंचपुर खु ता. परंडा जि. उस्मानाबाद, यांनी दि. 27.08.2023 रोजी 18.15 वा. सु. आपल्या ताब्यातील स्वीप्ट कार  क्र एमएच 04 एवाय 2658 ही चिंचपुर खु चौकात सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आंबी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये आंबी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.                                                                               

From around the web