कोळेवाडी येथील दहावीच्या विद्यार्थांचे अपहरण 

ढोकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 
 
s

धाराशिव -  तालुक्यातील कोळेवाडी येथील दहावी शिकणाऱ्या एका  विद्यार्थांचे अपहरण करण्यात आले आहे. याप्रकरणी पालकाने ढोकी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


धाराशिव  तालुक्यातील कोळेवाडी येथील यश बाबासाहेब चव्‍हाण ( वय 14 वर्ष, शिक्षण 10 वी )  हा कोळेवाडी येथून 18 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.00 वा.च्या सुमारास बसने उस्मानाबाद येथील मिनाक्षी एमएससीआयटी (MSCIT) कोर्सला गेला होता. तो आजपर्यंत परत कोळेवाडी येथे घरी परत आला नाही. तेंव्हा उस्मानाबाद येथे जाऊन शोध घेतला व चौकशी केली तसेच परगावी राहणारे नातेवाईक यांच्याकडे पण चौकशी केली. परंतु त्याचा शोध लागला नाही, 

मुलाने जातेवेळी घरातून 15 हजार रुपये घेऊन गेलेला आहे. माझ्या मुलास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे त्यामुळे पळवून नेणाऱ्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी, अशा प्रकारची तक्रार मुलाचे वडील बाबासाहेब दादासाहेब चव्हाण (मो.9168652397) यांनी दि.05 मे 2023 रोजी ढोकी येथील पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.

          हरवलेल्या मुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. रंग गोरा, उंची 150 सेमी, चेहरा गोल, मजबूत शरीरबांधा, केशरी रंगाचा शर्ट व काळी पँट, सरळ नाक असे वर्णन आहे. या वर्णनाचा मुलगा कोणास आढळून आल्यास ढोकी पोलिस ठाणे (02472-232033), पोलिस उपनिरीक्षक बी.वाय.गाडे, प्रभारी अधिकारी (9545555550) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ढोकी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक बी.वाय.गाडे यांनी केले आहे.

From around the web