कसई आणि मुर्टा मध्ये शेतीच्या वादावरून हाणामारी 

 
crime

 तुळजापूर  : आरोपी नामे-1) भिमराव उर्फ दादा बाबासाहेब शिंदे, 2) रेखाबाई बाबासाहेब शिंदे दोघे रा. कसई ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी शेतातील बांधावरील चारी बुजण्याचे कारणावरुन  दि. 18.09.2023 रोजी 11.30 वा. सु. कसई येथे फिर्यादी नामे- कुंडलिक माधव शिंदे, वय 85 वर्षे, रा. कसई, ता.तुळजापूर जि. धाराशिव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी कुंडलिक शिंदे यांनी दि.19.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504,506, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

          नळदुर्ग  : आरोपी नामे-1)कुमार भानुदास मोरे, 2) प्रविण कुमार दोघे रा. मुर्टा, ता. तुळजापूर जि. धाराशिव, यांनी दि. 18.09.2023 रोजी 16.00 वा. सु. आरोपीच्या घरासमोर मुर्टा येथे फिर्यादी नामे- प्रशांत सुधाकर चव्हाण, वय 31 वर्षे, रा. ब्राम्हणगल्ली, नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे मामा बाळु किल्लेदार यांना शेतीच्या वादाच्या बैठकी मध्ये शिवीगाळ का केली असे फिर्यादी व बंटी मुळे या दोघांनी नमुद आरोपीनां विचारल्याचा राग मनात धरुन आरोपी नामे कुमार मोरे यांने फिर्यादीस शिवीगाळ करुन गच्चीस पकडले व आरोपी प्रविण यांने तुला तर आता जिवच मारतो असे म्हणून त्याचे हातातील जम्याने फिर्यादीचे डावे बरगडीवर वार केला. त्यावर बंटी मुळे हा भांडण सोडवण्यास आला असता त्यांनाही जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे पोटाचे डावे बाजूस जम्याने वार करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी प्रशांत चव्हाण यांनी दि.19.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 323, 504, 506, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web