बेंबळी आणि मुरूम येथे शेतीच्या कारणावरून हाणामारी 

 
crime

बेंबळी  :आरोपी नामे-1)महादेव बळी भद्रे, 2)भैरु कशेव भद्रे, 3)सुनिल महादेव भद्रे, 4) अभिषेक गणेश भद्रे रा. वडाळा, ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.10.09.2023 रोजी सायंकाळी 17.00 वा. सु. करण रामचंद्र भद्रे यांचे शेतात वढाळा येथे फिर्यादी नामे-रवसाहेब बळी भद्रे, वय 50 वर्षे, रा.वढाळा, ता. जि.उस्मानाबाद हे शेतात पाईपलाईनचे तोंड काढत असताना तेथे पाईपलाईनचे तोंड काढायचे नाही तसेच तु आम्हाला शिवीगाळ का केली या कारणावरुन नमुद आरोपीतांनी  रावसाहेब भद्रे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्याने, खोऱ्याच्या दांड्याने उजव्या हातावर तसेच उजव्या पायावर मारुन जखमी केले. 

फिर्यादीचा दोन मुले महेश भद्रे व अविनाश भद्रे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी रावसाहेब भद्रे यांनी दि.13.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 मुरुम  :आरोपी नामे-1) मनीषा दयानंद आडे, रा ज्योती तांडा आलुर ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि.13.09.2023 रोजी 15.30 वा. सु. शरणप्पा बिराडे यांचे शेतात आलुर शिवार येथे फिर्यादी नामे- अनिल हरिशचंद्र आडे, वय 36 वर्षे, रा. ज्योती तांडा आलुर ता. जि. उस्मानाबाद हे शेरणप्पा बिराडे यांचे शेतात उडीद काढत असताना नमुद आरोपीने भांडणाची कुरापत काढून अनिल आडे यांचे डोक्यात दगडाने मारुन जखमी केले. शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी अनिल आडे यांनी दि.13.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे


अपघातात एक जखमी 

वाशी  : फिर्यादी नामे- भागवत देवीदास पवार, वय 72 वर्षे,रा. हळगाव, ता. जामखेड जि. अहमदनगर हे दि. 14.08.2023 रोजी 16.30 वा. सु. डोकेवाडी ते ईट जाणारे रोडवर पुडे कॉर्नरला मोटरसायकल वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 03 टिजे 6979 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून भागवत पवार यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली या आपघातात भागवत पवार हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी भागवत पवार यांनी दि.13.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह मो.वा. का. कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                       

From around the web