वाशी, भूम, अणदूर येथे तुंबळ हाणामारी 

 
crime

वाशी  : जुन्या भांडणाच्या कारणावरुन आरोपी नामे- 1)ज्योतीराम बामणे, 2)स्वाती ज्योतीराम बामणे रा. भांडवलेवस्ती वाशी यांनी फिर्यादी नामे- निवृत्ती विठ्ठल सुकाळे  वय 75 वर्षे यांना दि. 12.07.2023 रोजी 06.00 वा. सु.फिर्यादीचे घरासमोर भांडवलेवस्ती वाशी शिवार येथे जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, काठीने, कात्रीने निवृत्ती सुकाळे यांचे भुवईचे वर, नाकावर, हातावर, पोटावर वार करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या निवृत्ती सुकाळे यांनी दि.12.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-307, 324, 323, 504, 34 सह अ.जा.अ.ज.प्र.का. कलम 3(1)(आर)(एस), 3(2)व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

भूम : फिर्यादी नामे- संपत कोंडीबा जाधव, वय 48 वर्षे, रा. वाल्हा, ता. भुम, जि. उस्मानाबाद यांना दि.12.07.2023 रोजी 9.00 वा. सु जुनी ग्रामपंचायत वाल्हा येथे शेताकडे जाणाऱ्या रोडच्या कारणावरुन आरोपी नामे- सुग्रीव बळीराम चोरगे, 2) बाळासाहेब सुग्रीव चोरगे, 3) उमेश सुग्श्रीव चोरगे, 4) बाबुराव बळीराम चोरगे, 5) बाबु भागवत चोरगे, 6) सुरेश आप्पासाहेब भोरे, 7) भास्कर अभिमान चोरगे, 8) वामन रंगनाथ शेळवणे सर्व रा. वाल्हा, ता. भुम, जि. उस्मानाबाद यांनी  शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संपत जाधव यांनी दि.12.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : फिर्यादी नामे- कृष्णा नव्हु लोंढे, वय 19 वर्षे, रा. वत्सलानगर अणदुर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद हे सोबत त्यांचा मावस भाउ हे दि.10.07.2023 रोजी 19.00 वा. सु. आरोपी नामे 2) रवि भोसले यांचे मुलाचे हातात असलेल्या सापाचे डब्याकडे पाहत असताना आरोपी क्र 1 मधुकर बंदपट्टे यांनी कृष्णा लोंढे व त्यांचा  मावस भाउ यांना शिवीगाळ केली. कृष्णा लोंढे हे मधुकर यांना म्हणाले की, दादा शिव्या देउ नको असे म्हणताच मधुकर बंदपट्टे यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान केली.तसेच आरोपी नामे 1)मधुकर बंदपट्टे, 2) रवि भोसले, 3) दिनेश बंदपट्टे, 4)अमोल धोत्रे, 5) महेश आपटे, 6) उमेश बंदपट्टे, 7) सुरज विठ्ठल सर्व रा. वत्सलानगर अणदुर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद या सर्वांनी कृष्णा लोंढे व त्यांचे मावस भाउ, आजी व इतर महिला यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या कृष्णा लोंढे यांनी दि.12.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-327, 294, 323, 143, 147, 149, 504 सह अ.जा.अ.ज.प्र.का. कलम 3(1), 3(1)(आर)(एस), 3(2)व्हिए), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web