जेवळी आणि इटकळ मध्ये हाणामारी 

 
crime

लोहारा  : जेवळी पुर्व, ता. लोहारा येथील- संदीप जाधव, यांनी दि.27.06.2023 रोजी 21.30 वा.सु. घरासमोरुन हाकलून दिला असे म्हणाल्याचा रागा मनात धरुन जिवे मारण्याचे उद्देशाने जेवळी उत्तर, ता. लोहारा येथील-भोजाप्पा रत्नाप्पा कारभारी यांना शिवीगाळ करुन लाथाबुंक्यानी, कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखीम केले. तसेच भोजाप्पा यांचे भाउ रत्नाकर हे त्यांचे बचावास आले असता त्यासही शिवीगाळ करुन कोयतृयाने डावे हातावर मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या भेजाप्पा रत्नाप्पा कारभारी यांनी दि.30.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-307, 504, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : इटकळ, ता. तुळजापूर येथील- तोसीफ मुजावर, जिकुर खुद्दे, पापा भांबरते, शोयब मुजावर, असिफ मुजावर, सादीक शेख अन्य 4 या सर्वांनी काही एक कारणनसतानी संगणमत करुन दि.29.06.2023 रोजी 14.00 वा.सु. इटकळ येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी कमानीजवळ गावकरी- श्रीनिवास अजुर्न पांढरे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, दगडाने, चपलाने मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या श्रीनिवास पांढरे यांनी दि.29.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 149  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : इटकळ, ता. तुळजापूर येथील- सतिश पांढरे, अनिल पांढरे, श्रीनिवास पांढरे, लक्ष्मण पांढरे, दादा भोपळे या सर्वांनी आर्थिक व्यवाहाराच्या कारणावरुन संगणमत करुन दि.29.06.2023 रोजी 13.30 वा.सु. इटकळ येथील श्रध्दा धाब्याजवळ गावकरी- हसन बाबु मकानदार यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने डोक्यात मारहाण  करुन जखमी केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हसन मकानदार यांनी दि.30.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 149  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

लोहारा  : पेठसांगवी, ता. उमरगा येथील- नौशाद ईमाम मुजावर वय 23 वर्षे यांनी दि. 28.06.2023 रोजी 20.30 वा. सु. पेसांगवी येथील पाणी पुरवठा विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. नौशाद यांचे पती-  ईमाम हबीब मुजावर, सासु- अबीदा हबीब मुजावर,  दिर- जावेद मुजावर, मुन्ना मुजावर यांनी टीव्ही आणली तरच नांदायला ये असे बोलून मला कॉम्प्युटर चे दुकान टाकायचे आहे. तुम्ही एक लाख्‍ रुपये द्या नाहीतर मी तुमच्या मुलीस सांभाळणार नाही. असे म्हणून नौशाद यांना शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यांच्या वेळोवेळी होत असलेल्या जाचास व त्रासास कंटाळून नौशाद यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचे वडील- शहाबुद्दीन अलीम बक्षी, वय 40 वर्षे, रा. भादा, ता. औसा यांनी दि.30.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 498(अ), 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web