ढोकी आणि नळदुर्गमध्ये हाणामारी 

 
crime

ढोकी  : फिर्यादी नामे- माणिक अर्जुन देवकते, वय 25 वर्षे, रा. तेर पेठा, ता.जि. उस्मानाबाद हे दि.10.07.2023 रोजी 11.30 वा.सु. जुने बसस्थानक मरुतीचे मंदीरावळ थांबले असता बहिणीस पळून जाण्यासाठी का मदत केली या कारणावरुन आरोपी नामे-1) तेजस राजाभाउ नाईकवाडी 2) अक्षय राजाभाउ नाईकवाडी दोघेही रा. तेर, ता.जि. उस्मानाबाद  यांनी माणिक देवकाते यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहान करुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या माणिक देवकते यांनी दि. 10.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून ढोकी पो.ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : फिर्यादी नामे- सौ. माया व्यकंट शिंदे वय 40 वर्षे, रा. सुगाव, ता. चाकुर, जि. लातुर या दि.09.07.2023 रोजी 11.3018.00 वा.सु. वडीलाचे घरी सिंदगाव, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथे  असताना कौटुंबिक कारणावरुन आरोपी नामे-व्यंकट शिवाजी शिंदे, रा. सुगाव, ता. चाकुर, जि. लातुर यांनी त्यांची पत्नी माया शिंदे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, ब्लेडने गालावर मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या सौ माया शिंदे यांनी दि. 10.07.2023 रोजी दिलेल्या वैद्याकिय जबाबावरुन नळदुर्ग पो.ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 504  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक

धाराशिव  : फिर्यादी नामे- गणेश केशवराव गिरी, वय 40 वर्षे, महिंद्रा रुरल हाउसिंग फायनांन्स मध्ये शाखा अधिकारी परभाणी रा. सिडको न्यु, नांदेड  यांनी तक्रार दिली की, आरोपी नामे- येथील- 1)शैलेश रामा मुंडे, 2)पल्लवी शैलेश मुंडे रा. पवारवाडी, ता.जि. उस्मानाबाद या दोघांनी पडीक घरा ही मालमत्ता त्यांच्या मालकीचे नसतानाही ती त्यांचे मालकीची असल्याचे भासवुन ती  आरेपी 1) अमर घुटे रा. रुई, ढोकी ता.जि. उस्मानाबाद, 2)एस बी आनदुरकर, रा. बार्शी रोड, जि. लातुर, 3)संदीप अशोकराव देशमुख, रा. संभाजीनगर डिकसळ, ता. कळंब, जि. उस्मानाबाद 4)अशिष  अहमदसाब शेख रा. माकणी, थोर जि. लातुर यांचे करवी बनावट दस्तएैवज तयार करुन ते खरे असल्याचे भासवुण महिंन्द्रा रुरल हाउसिंग फायनान्स लि. शाखा उस्मानाबाद या कंपनीची 7,50,000 ₹ ची फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या महिंद्रा रुरल हाउसिंग फायनांन्स मध्ये शाखा अधिकारी परभाणी- गणेश केशवराव गिरी यांनी दि. 10.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून उस्मानाबाद ग्रामीण पो.ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, 465, 468, 471, 34  अन्वये वर नमुद आरोपी विरुध्द गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web