धाराशिव आणि नळदुर्ग मध्ये हाणामारी 

 
crime

नळदुर्ग  : आरोपी नामे-1)राहुल राजेंद्र कोकणे,2) विशाल राजेंद्र कोकणे, दोघे रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.22.09.2023 रोजी 11.00 ते 11.30 वा. सु. नळदुर्ग शिवारातील आपले घर जवळील एनएच 65 रोडजवळ फिर्यादी नामे- विष्णु भिमराव नारायणकर, वय 30 वर्षे, रा. लोहारा, ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपी म्हणाले की तु आमच्या विरुध्द लोहारा पोलीस ठाणे येथे तक्रार का दिली या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयत्याने, चाकुने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी विष्णु नारायणकर यांनी दि.23.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : आरोपी नामे-1)रमाबाई भिकाजी ओहाळ, 2) अश्विनी सचिन ओहाळ, 3) सचिन भिकाजी ओहाळ, 4) नितीन भिकाजी ओहाळ सर्व रा. येडशी ता जि. धाराशिव यांनी दि.17.09.2023 रोजी 06.00 वा. सु. येडशी  येथे  फिर्यादी नामे- दिशा सचिन साबळे, वय 29 वर्षे, रा. हनुमान चौक धाराशिव ह.मु. रामलिंग नगर, येडशी, ता. जि. धाराशिव यांना लहान मुलांचे सायकल खेळण्याचे भांडण तक्रारी वरुन नमुद आरोपीतांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने तोंडावर डाव्या बाजूस मारुन 6 दात पाडले. दिशा साबळे यांचे बचावास त्यांचे वडील दिलीप वाघमारे आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन कुह्राडीचे दांड्याने मारुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी दिशा साबळे यांनी दि.23.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 325, 323, 504, 506, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web