उमरगा, ढोकी, तामलवाडी येथे हाणामारी 

 
crime

उमरगा  :आरोपी नामे- 1)चंद्रकांत तुकाराम मानेगोपाळे, 2) भास्कर चंद्रकांत मानेगोपाळ, 3) ज्ञानेश्वर दत्तुपंत मानेगोपाळ, 4) राहुल राजेंद्र मानेगोपाळे सर्व रा. कदेर ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि.22.08.2023 रोजी 22.49 फिर्यादी नामे- जयराम राजाराम मानेगोपाळ, वय 29 वर्षे, रा. कदेर ता. उमरगा जि. उस्मानाबाद फिर्यादी यांचे चुलते यांना नमुद आरोपीतांना “डीपीतील वायर का काढता?”असे विचारले असता नमुद आरोपीतांनी शिवीगाळ करुन “डी. पी. आमचे मालकी हक्काचे आहे” असे म्हणून फिर्यादीच्या चुलत्याच्या डावे मनगटावर कत्तीने मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी जयराम मानेगोपाळ यांनी दि.23.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : आरोपी नामे-1)धनंजय नेमीनाथ फेरे, 2) कुलदिप धनंजय फेरे, 3) अजय धनंजय फेरे, सर्व रा. तावरजखेडा ता. जि. उस्मानाबाद यांनी दि. 23.08.2023 रोजी 19.30 वा. सु. तावरजखेडा येथील हनुमान मंदीराजवळ फिर्यादी नामे- काकासाहेब हनुमंत फेरे, वय 41 वर्षे रा. तावरजखेडा ता.जि. उस्मानाबाद हे आरोपातांना आमचे सोयाबीनच्या पिकात जनावरे का चारले असे विचारले असता आरोपी क्र 1 ते 3 यांनी फिर्यादीचे भावास लाथाबुक्यांनी मारहाण करीत असतांना फिर्यादी हा भांडण सोडविण्यास गेला असता नमुद आरोपीतांनी त्यांचे डोक्यात दगडाने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या काकासाहेब फेरे यांनी दि.23.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : आरोपी नामे- 1)मनोज नरसिंग धावणे,2) महेश नरसिंग धावणे, 3) पंकज संतोष धावणे 4) योगेश भरत धावणे,5 ) स्वप्नील सपाटे 6) बळीराम सदाशिव धावणे, 7) किशोर बळीराम धावणे, 8) किरण संतोष धावणे, 9) नरसिंग विठोबा धावणे, 10) उमेश उत्रेश्वर धावणे, 11) धलाजी ज्ञानोबा धावणे, सर्व रा. वडगाव काटी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद यांनी  दि. 23.08.2023 रोजी 11.00 वा. सु. वडगाव काटी येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे गैरकायद्याची मंडळी जमवून  फिर्यादी नामे- प्रकाश गणपती डावरे, वय 39 वर्षे, रा. वडगाव काटी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करत असताना गौरीशंकर कोडगीरे हे प्रकाश डावरे यांचे बचावास आले असता त्यासही लाथाबुक्यांनी मारहाण करुन ग्रामपंचायत मधील टेबलवरील काच फोडून नुकसान केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रकाश डावरे यांनी दि.23.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, 427 सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(1) (एस),3(1) (आर), 3(2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : आरोपी नामे- 1)प्रकाश गणपत डावरे,2) गौरीशंकर चंद्रकांत कोडगीरे, 3) विनोद कोडगीरे 4) विठ्ठल कोडगीरे,5 ) अविनाश कोडगीरे 6) सुरज पाटील, 7) राहुल म्हमाणे, 8) अमोल कोडगीरे, 9) सचिन अस्वले, 10) नागेश अस्वले सर्व रा. वडगाव काटी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद यांनी  दि. 23.08.2023 रोजी 11.00 वा. सु. वडगाव काटी येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे गैरकायद्याची मंडळी जमवून  फिर्यादी नामे- त्र्यंबक महादेव सावळे, वय 82 वर्षे, रा. वडगाव काटी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करत असताना पंकज धावणे, महेश धावणे हे त्र्यंबक सावळे यांचे बचावास आले असता प्रकाश डावरे यांनी त्यासही लाथाबुक्यांनी मारहाण करुन पंकज धावणे यांच्या पाटीत लाकडी फळीने मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या त्र्यंबक सावळे यांनी दि.23.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, 427 सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(1) (एस),3(1) (आर), 3(2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web