उमरगा आणि नळदुर्ग येथे हाणामारी 

 
crime

उमरगा  : आरोपी नामे- 1)राजेंद्र दिगंबर माने, 2)लक्ष्मण राजेंद्र माने, 3) भरत दिगंबर माने 4) श्रीनिवास भारत माने व एक आनोळखी महिला व पुरुष सर्व रा. बेडगा, ता.उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि.05.09.2023 रोजी 18.00 वा. सु. गोपाळ पाटीजवळ रोडवर फिर्यादी नामे- प्रकाश विश्वनाथ आष्टे, वय 56 वर्षे, रा. सदननगर, उमरगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना व सोबत पत्नी भाग्यश्री प्रकाश आष्टे, अनिल टकले, महेश पाटील हे कार ने घरी जात असताना नमुद आरोपीने चोरीचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरुन फिर्यादी यांची कार आडवून कारचे काचावर दगड फेकून फिर्यादीस तुला आत्ता खल्लास केल्याशिवाय सोडणार नाही असे म्हणून नमुद आरोपीतांनी जिवे मारण्याचे उद्देशाने फिर्यादी शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, काठी, कोयता व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी भाग्यश्री प्रकाश आष्टे, अनिल टकले, महेश पाटील यांनाही शिवीगाळ करुन मारहान केली.तसेच फिर्यादीच्या हातातील मोबाईल, सोन्याची कडा गळ्यातील लॉकेट, रोख रक्कम असा एकुण 2,55,000 ₹ किंमतीचा माल काढून घेतला आहे. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी प्रकाश आष्टे यांनी दि.06.09.2023 दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन उमरगा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 324, 327,143, 148, 149, 427,  323, 504, 506अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : आरोपी नामे- 1) दगडू हरीशचंद्र पवार, 2) किशोर रमेश पवार, 3) विक्रम रमेश पवार, 4) कृष्णा कमलाकर पवार सर्व रा. केशेगाव तांडा ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि. 05.09.2023 रोजी 19.00 वा. सु. केशेगाव तांडा येथे फिर्यादी नामे- तानाजी रामा राठोड, वय 34 वर्षे, रा. केशेगाव तांडा ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना विकलेली मोटरसायकल परत घेण्याचे कारणावरुन त्याचा राग मनात धरुन नमुद आरोपीतांनी शिवीगाळ करुन दगड, लाकडाने पाठीत मारहाण केली. तसेच फिर्यादीची आई व काकू हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन सळईने व चैनने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी तानाजी राठोड यांनी दि.06.09.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web