उमरग्यात दोन ठिकाणी हाणामारी 

तुळजापूर, येरमाळा, भूम  येथेही गुन्हा दाखल 
 
crime

उमरगा : आरोपी नामे-1) अर्जुन तानाजी जाधव, वय 25 वर्षे, 2) छाया तानाजी जाधव, वय 45 वर्षे,3 ) तानाजी जाधव, वय 50 वर्षे, 4) अविनाश चव्हाण, वय 38 वर्षे रा. बलसुरतांडा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी कौटुबिंक वादाचे कारणावरुन दि.21.08.2023 रोजी 08.00 वा. सु. बलसुर येथे आरोपीचे घरी फिर्यादी नामे- शिल्पा अर्जुन जाधव, वय 22 वर्षे, रा. बलसुरतांडा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ करुन मारहाण केली होती. सदरची बाब ही फिर्यादी यांनी  वडील हरी राठोड, आई चांगुणा राठोड रा. मुळज तांडा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना सांगितली असता फिर्यादीचे आई वडील आरोपी यांना समजवण्यासाठी गेले असता नमुद आरोपीतांनी त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शिल्पा जाधव यांनी दि.21.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504,506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा  : आरोपी नामे- 1)चांगुना हरी राठोड, 2) हरी राठोड, 3) लखन चव्हाण रा. मुळज तांडा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी त्यांचे मुलीला केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेले असता भांडण कुरापत काढून दि.21.08.2023 रोजी 09.30 वा. सु. बलसुर तांडा येथे फिर्यादी नामे- छाया तानाजी जाधव, वय45 वर्षे, रा. बलसुरतांडा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांचे घरा समोर आरोपीतांनी रात्री आमच्या मुलीस का मारहाण केली या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने फिर्यादी यांचे हातावर मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा त्यांचे बचावास आला असता त्यासही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या छाया जाधव यांनी दि.21.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504,506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  :आरोपी नामे- 1)अरबाज अफसर सय्यद, 2)अझर अफसर सय्यद, 3) रिहाण जहीर सय्यद सर्व रा. हाडको, तुळजापूर ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद यांनी फिर्यादी यांचे जागेत वरील आरोपी हे गाडी लावत होते या कारणावरुन दि.20.08.2023 रोजी 20.30 वा. सु. हाडको येथे फिर्यादी नामे फजल ईकबाल सय्यद, वय 31 वर्षे रा.हाडको, तुळजापूर, ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद यांना वर नमुद आरोनी यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी फजल सय्यद यांनी दि.21.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 येरमाळा  : आरोपी नामे-1)बन्सी श्रीरंग ओव्हाळ, 2) विकास बन्सी ओव्हाळ,3) कमलाबाई बन्सी ओव्हाळ,4) कोमल विकास ओव्हाळ सर्व रा. पानगाव, ता. कळंब ता. जि. उस्मानाबाद यांनी फिर्यादी नामे- बायडाबाई लक्ष्मण ओव्हाळ, वय 65, रा. पानगाव ता. कळंब जि. उस्मानाबाद यापुर्वी विना कारण मारहाण केल्याने त्याचा जाब विचारण्यास फिर्यादी गेले असता दि.19.08.2023 रोजी 08.00 वा. सु. फिर्यादीचे घरसमोर फिर्यादी व फिर्यादीचा नातु यांना आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी काठीने पोटात डोक्यात मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बायडाबाई ओव्हाळ यांनी दि.21.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504,506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : आरोपी नामे- 1) कार्तिक भालचंद्र नागने, 2) कमलेश भालचंद्र नागने दोघे रा. मंगळवेढा जि. सोलापूर यांनी आर्थिक व्यावहारच्या कारणावरुन दि.21.08.2023 रोजी 16.30 वा. सु. तहसिल कार्यालय भुम समोरील फिर्यादीचे सेतु सुविधा केंद्र ता. भुम येथे फिर्यादी नामे सोमनाथ हरीबा मिसाळ वय 70 वर्षे रा. बह्राणपुर, ता. भुम जि. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन कोयता घेवून तु माझे नादी लागला तर तुला जिवच मारतो असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सोमनाथ मिसाळ यांनी दि.21.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 323, 504, 506, 34 सह कलम 4/25 आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

From around the web