नळदुर्ग , भूम, मुरूम येथे हाणामारी 

 
crime

 नळदुर्ग  -आरोपी नामे-1)युवराज सिद्राम सुतार, 2) मल्लीकार्जुन किसन सुतार, 3) विक्रम युवराज सुतार 4) राजु मल्लिकार्जुन सुतार 5) विजायकुमार मल्लीकार्जुन सुतार सर्व रा. आरळी खुर्द ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद गाडी रस्त्याचे कारणावरून दि.18.07.2023 रोजी सायंकाळी 13.00 वा. सु. शेत गट नं 22 मध्ये पडीक रस्त्यावर आरळी खुर्द येथे फिर्यादी नामे- दगडू खंडु व्हटकर, वय 58, रा. आरळी खुर्द, ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद यांना जातीवाचक शिवीगाळ करुन हातात दगड घेवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दगडू व्हटकर यांनी दि.19.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 504, 506 सह अ. जा. ज. अ. प्र. का.कलम 3(1)(आर), 3(1)(एस), 3(2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 भूम  :आरोपी नामे- 1)विशाल सुभाष शिंदे, 2) अजय बप्पा शिंदे, 3) भाउ शिंदे घिे रा. भिमनगर भुम ता.भुम जि. उस्मानाबाद यांनी तंबाखु न देण्याचे कारणावरुन दि.18.07.2023 रोजी सायंकाळी 23.00 वा. सु. परंडा ते गोलाई चौक भुम कडे जाणारे रस्त्यावर सुनिल माळी यांचे दुकानासमोर  फिर्यादी नामे- धनंजय नवनाथ गावळी, वय 40वर्षे, रा. गवळी वाडा, भुम ता. भुम जि. उस्मानाबाद यांना विशाल शिंदे यांनी  शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने पाटीत डोक्यात मारहान करुन जखमी केले.तसेच आरोपी नामे अजय शिंदे व भउ शिंदे यांनी दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या धनंजय गवळी यांनी दि.19.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : आरोपी नामे-1) जमीन मंगलसब पठाण, 2) समीर मंगलसब पठाण, दोघे रा. बागजरी ता. अंबाजोगाई  जि. बीड, 3)श्रीकांत रमाकांत विरकर, 4) अशिष नरसिंग गंगणे, 5) इरुान ईस्माईल शेख, 6) समीर सय्यद शेख, 7) समाधान गोपाळ पांचाळ, 8) लखन कापसे   3 ते 8 रा. घनसगाव, ता. रेणापूर यांनी  मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून  दि. 18.07.2023 रोजी 17.00 वा. सु. येणेगुर गावात एनएच 65 रोडवर फिर्यादी नामे- दाउद सुलेमान शेख, वय 23 वर्षे रा. वडवळ नागनाथ ता. चाकुर जि. लातुर यांचे ट्रॅक्टर क्र एमएच 04 पीएफ 5631 ला स्कार्पिओ वाहन आडवे लावून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान केली. जिवे ठार मारण्याची धामकी दिली. अशा मजकुराच्या दाउद शेख यांनी दि.19.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 341, 143, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web