कसबे तडवळे येथे हॉटेलच्या जागेवरून दोन गटात तुफान हाणामारी
ढोकी : आरोपी नामे-1) अशोक भगवान देशमाने, 2) कमल अशोक देशमाने, 3) धनंजय अशोक देशमाने,4) रोहीत प्रभु देशमाने,5) विमल प्रभु देशमाने सर्व रा.क. तडवळे, ता. जि. उस्मानाबाद यांनी हॉटेलचे जागेचे कारणावरुन दि.13.08.2023 रोजी 20.00 वा. सु.तडवळा बसस्थानक येथे चहाचे हॉटेलवर फिर्यादी नामे- बापु भगवान देशमाने, वय 54 वर्षे, रा. कसबे तडवळा, ता. जि. उस्मानाबाद यांची पत्नी मंगल देशमाने यांना संगणमत करुन लोखंडी सतुराने हातावर मारुन जखमी केले. बापु देशमाने हे त्यांच्या पत्नीच्या बचावास आले असता त्यासही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बापु देशमाने यांनी दि.16.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : आरोपी नामे-1)बापु भगवान देशमाने, 2) मंगल बापु देशमाने रा.कसबे. तडवळे, ता. जि. उस्मानाबाद यांनी हॉटेलचे जागेचे कारणावरुन दि.12.08.2023 रोजी 21.00 ते 21.30 वा. सु. कसबे तडवळा बसस्थानक येथे चहाचे हॉटेलवर फिर्यादी नामे- धनंजय अशोक देशमाने, वय 32 वर्षे, रा. कसबे तडवळा, ता. जि. उस्मानाबाद यांचे हॉटेलची जागा वाटून घेवू असे बोलत असताना बापु देशमाने यांनी फिर्यादीस व तृयांचे वडीलास शिवीगाळ करुन वडील कोयत्याने हातावर मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीची आई व चुलती या त्यांच्या बचावास आले असता त्यासही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या धनंजय देशमाने यांनी दि.16.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कंडारीत हाणामारी
आंबी : आरोपी नामे-1) दत्तात्रय दिगांबर देशमुख, रा. कंडारी, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांनी बल्ब ठेवण्याचे कारणावरुन दि.16.08.2023 रोजी 09.30 वा. सु.कंडारी शिवार फिर्यादी नामे- जानका दत्तात्रय देशमुख, वय 35 वर्षे, रा. कडांरी, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांना परंडा येथुन आणलेले चार बल्ब कोठे ठेवले आहेत या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण केल्याने जानका यांच्या ओठ फाटून व डोळ्याखाली लागून गंभीर जखमी केले.अशा मजकुराच्या जानका देशमुख यांनी दि.16.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 323, 504अन्वये गुन्हा नोंदवला आहे.