उमरग्यात दोन ठिकाणी हाणामारी , तीन जखमी 

 
crime

उमरगा  : आरोपी नामे-1) आकाश नगरे, 2)सुरज अन्य 1 सर्व रा. उमरगा ता.उमरगा जि. उस्मानाबाद यांनी  दि.26.07.2023 रोजी सायंकाळी 10.30 वा. सु. काळे प्लॉट उमरगा येथे फिर्यादी नामे-अजरोद्दीन रशिल बागवान, वय 24 वर्षे रा. हमिदनगर, ता. जि. उस्मानाबाद हे मोहरम बघणेसाठी काळे प्लॉट उमरगा येथे  असता आरोपी  आकाश यांने शिवीगाळ करुन रॉडने डोक्यात मारुन जखमी केले. आरोपी  सुरज यांने अजरोद्दीन यास हंटर व फरशीने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अजरोद्दीन बागवान यांनी दि.27.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324,  323, 504, 506, 427, 34  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा  : आरोपी नामे-1) विकास पांडुर्रग भोसले, रा. कुन्हाळी 2)चंनविर बाबुगोल, रा. भुसणीवाडी, 3) शैलेश नरवटे, अन्य 1 यांनी पाण्याचा जग उचलण्याचे कारणावरुन दि.26.07.2023 रोजी 16.00 वा. सु. डिग्गी रोड चौक उमरगा येथे न्यु जंजीरा हॉटेल मध्ये फिर्यादी नामे नागेश राजु घोडके, वय 28 वर्षे रा. श्रमजिवी कॉलेजच्या पाठीमागे उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना तुला लय माज आलाय का असे म्हणून  शिवीगाळ करुन स्टिलसारखा दांडपट्टा व हंटरने डोक्यात, पाठीवर, तोडांवर उजवे हातावर गंभीर मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नागेश घोडके यांनी दि.26.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 504, 506, 34  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 निष्काळजीपने वाहने चालवणाऱ्यावर गुन्हे नोंद

कळंब  : अरोपी नामे- 1) लक्ष्मण दगडू चव्हाण, वय 42 रा. नांदणी ता. बार्शी, जि. सोलापूर यांनी दि.27.07.2023 रोजी 16.10 वा. सु. तहसील कार्यालया समोर कळंब येथे आपल्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात निष्काळजीपने चालवत असताना कळंब पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्ती विरुध्द भा.दं.वि.सं. कलम- 279 अन्वये कळंब पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web