धाराशिव शहरात चिकन दुकानासमोर दोन गटात हाणामारी 

 
crime

धाराशिव  : खिरणी माळा, रसुलपूरा उस्मानाबाद येथील- अफजलकुरेशी, अहेमद कुरेशी, अन्य 1 यांनी  दि.05.06.2023 रोजी 19.30 वा.सु. चिकन दुकानासमोर देशपांडे स्टॅन्ड उस्मानाबाद येथे शांतीनिकेतन सोसायटी, भानुनगर, उस्मानाबाद येथील- शहाब इरशाद कुरेशी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने, डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. शहाब यांच्या बचावास त्यांचे  शारेब हे आले असता त्यासही शिवीगाळ करुन मारहान केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या  शहाब कुरेशी यांनी दि. 10.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : मोमीण गल्ली, परंडा येथील- मोहम्मद शफी अन्वर हन्नुरे, अमिर हामजा हन्नुरे, नवार हन्नुरे, मुस्तफा हन्नुरे या सर्वांनी  विरोधात साक्ष देण्याचे कारणावरून दि.08.06.2023 रोजी 18.00 वा.सु. बस स्थानका शेजारील सायकल रिपेअरींगच्या दुकानासमोर परंडा येथे गावकरी- जिलानी जहांगीर हन्नुरे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने, मारहान करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या जिलानी हन्नुरे यांनी दि. 10.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम-  324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : काटी लमाण तांडा, ता. तुळजापूर येथील- रेजीत राठोड, सुरेश राठोड, उमेश राठोड, नामदेव राठोड, एकनाथ चव्हाण, दिपक चव्हाण, नवनाथ चव्हाण अन्य 2 या सर्वांनी  पाईपलाईन खोदण्याच्या कारणावरून दि.28.05.2023 रोजी 21.30 वा.सु. आगलावे यांचे शेतात काटी शिवर येथे गावकरी-लक्ष्मण सिताराम पवार यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने, लोखंडी पाईपने, डोक्यात मारहान करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या लक्ष्मण पवार यांनी दि. 10.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web