रहदारीस धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

 
Osmanabad police

मुरुम : रामचंद्र संभाजी मुळे, रा. मुरुम, ता. उमरगा दि. 08.01.2022 रोजी 16.00 वा. सु. म. बस्वेश्वर चौक, मुरुम येथील सार्वजनिक रस्त्यावर पिकअप वाहन क्र. एम.एच. 12 एडी 2292 हा तर मल्लिनाथ प्रकाश संगशेट्टी, येणेगूर, ता. उमरगा यांनी गावातील सार्वजनिक रस्त्यावर ॲपेरिक्षा क्र. एम.एच. 23 एच 8034 हा रहदारीस धोकादायकपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन नमूद दोघांविरुध्द मुरुम पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

जुगार विरोधी कारवाई

उस्मानाबाद : 1)उस्मानाबाद येथील प्रतिक गंगावणे व अभिषेक राठोड हे दोघे दि. 08.01.2022 रोजी शहरातील एका गाळ्यात ऑनलाईन चक्री जुगार चालवण्याचे साहित्यासह 16,400 ₹ रोख रक्कम बाळगलेले आनंदनगर पोलीसांना आढळले. 2) तुरोरी, ता. उमरगा येथील गणेश कांबळे हे दि. 08 जानेवारी रोजी गाव शिवारात कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,160 ₹ रोख रक्कम बाळगलेले उमरगा पोलीसांना आढळले. तर 3) सास्तुर, ता. लोहारा येथील रंगराव चिवरे हे गावातील चौकात कल्याण मटका जुगार साहित्यासह 695 ₹ रक्कम बाळगलेले लोहरा पोलीसांना आढळले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद : 1)आष्टाकासार, ता. लोहारा येथील लक्ष्मण काशीनाथ सोमवंशी हे दि. 08.01.2022 रोजी आष्टाकासार शिवारात 9 लि. हातभट्टी दारु बाळगले असतांना मुरुम पोलीसांना आढळले. 2) सोलापूर येथील विजय मानसिंग चव्हाण हे दि. 08 जानेवारी रोजी खडकी शिवारातील एका शेतात गुळ- पणी मिश्रीत हातभट्टी दारु निर्मीतीचा 200 लि. द्रव पदार्थ बाळगले असतांना तामलवाडी पोलीसांना आढळले. तर 3)रांजणी, ता. कळंब येथील विलास रंगनाथ जाधव हे दि. 08 जानेवारी रोजी गाव शिवारात 15 लि. हातभट्टी दारु बाळगले असतांना शिराढोन पोलीसांना आढळले.

            यावरुन पोलीसांनी हातभट्टी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ जप्त करण्यास व सांभाळण्यास अशक्य असल्याने तो पोलीसांनी जागीच ओतून नष्ट केला तर उर्वरीत गुन्ह्यातील मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web