बेंबळीत अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

बेंबळी  : ताकविकी शिवारातील महामार्गावर दि. 05.12.2021 रोजी 03.15 वा. सु. एका मिनीट्रकचा अपघात झाल्याच्या माहितीवरुन बेंबळी पो.ठा. चे पथक अपघात स्थळी पोचले असता अपघात ग्रस्त मिनीट्रकमध्ये 12 पोत्यांत एकुण 3,960 पुडके असा 4,75,200 ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा हा अन्नपदार्थ आढळला. यावरुन बेंबळी पोलीस ठाण्याचे अंमलदार- रियाज पटेल यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद मिनीट्रक च्या अज्ञात चालक- मालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 336, 272, 273, 188, 328 सह अन्न व मानके सुरक्षा अधिनियम कलम- 59 आणि मो.वा.का. कलम- 134, 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई

उस्मानाबाद : 1) उमरगा ग्रामस्थ- संतोष सोनटक्के हे दि. 17.12.2021 रोजी गावातील बस स्थानकाजवळ व कदमापूर, ता. उमरगा ग्रामस्थ- भीम भाले हे कुन्हाळी गावात मटका जुगार साहित्‍यासह 1,425 ₹ बाळगले असतांना उमरगा पोलीसांना आढळले. 2) मोमीन गल्ली, कळंब येथील गोविंद काळजादे हे कळंब येथील एका हॉटेलजवळ मटका जुगार साहित्यासह 930 ₹ रक्कम बाळगले असतांना कळंब पोलीसांना आढळले. 3) शिराढोन, ता. कळंब येथील पाशा सय्यद हे गावातील किराणा दुकानाजवळ मटका जुगार साहित्यासह 350 ₹ रक्कम बाळगले असतांना शिराढोन पोलीसांना आढळले. 4) सांजा येथील बालाजी कोळी, अविनाश गवळी व शिंगोली येथील दत्ता रणदिवे हे तीघे उस्मानाबाद येथील एका गाळ्यात चक्री मटका जगार साहित्यासह 18,950 ₹ रक्कम बाळगले असतांना आनंदनगर पोलीसांना आढळले. 5) सोनेगाव, ता. उस्मानाबाद येथील दत्तात्रय मोरे हे येडशी गावातील सोनेगाव रस्त्यावरील एका पानटपरीसमोर कल्याण मटका जुगार साहित्यासह 430 ₹ रक्कम बाळगले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांना आढळले.

            यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 6 गुन्हे नोंदवले आहेत.

 
अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : अवैध मद्य विरोधी कारवाईदरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 17.12.2021 रोजी 11 ठिकाणी छापे मारुन 11 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम अंतर्गत खालीलप्रमाणे 11 गुन्हे नोंदवले आहेत.

1) एकुरगा ग्रामस्थ- विजय कांबळे हे आपल्या घरात एका कॅनमध्ये 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेले उमरगा पोलीसांना आढळले. तर नागराळ, ता. उमरगा ग्रामस्थ- गोप्या तेलंग  हे गावातील शेतात दोन प्लास्टीक कॅनमध्ये 70 लि. हातभट्टी दारु बाळगले असतांना उपविभागी पोलीस अधिकारी, उमरगा यांच्या पथकास आढळले.

2) सालेगाव, ता. लोहारा ग्रामस्थ- गोविंद माने हे आपल्या घरासमोरील जागेत देशी दारुच्या 9 सिलबंद बाटल्या बाळगलेले तर हिप्परगा (रवा), ता. लोहारा ग्रामस्थ- गाव शिवारात देशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या बाळगले असतांना लोहारा पोलीसांना आढळले.

3) आरसोली, ता. भूम ग्रामस्थ- मुक्ताबाई पवार या आपल्या घरासमोर 9 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या तर भवानवाडी, सुकटा, ता. भूम ग्रामस्थ- मच्छिंद्र काळे हे आपल्या घरासमोर 9 लि. हातभट्टी दारु बाळगले असतांना शिराढोन पोलीसांना आढळले.

4) जायफळ शिवार, ता. कळंब ग्रामस्थ- मिराबाई काळे या गावातील शिराढोन रस्त्यालगत 5 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या तर पारधी पिढी, शिराढोन ग्रामस्थ- कविता काळे या पिढीवरील एकुरगा रस्त्यालगत 5 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असतांना शिराढोन पोलीसांना आढळल्या.

5) आष्टाकासार, ता. लोहारा येथील मुकेश अवताडे हे गावातील बस थांब्यामागे 8 लि. हातभट्टी दारु बाळगले असतांना मुरुम पोलीसांना आढळले.

6) उस्मानाबाद येथील दिपक पवार हे राहत्या परिसरात 90 मि.ली. क्षमतेच्या 44 बाटल्या देशी दारु बाळगले असतांना उस्मानाबाद (श.) पोलीसांना आढळले.

7) कन्हेरवाडी, ता. कळंब ग्रामस्थ- रजनी काळे या गाव शिवारात एका कॅनमध्ये 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असतांना कळंब पोलीसांना आढळल्या.

From around the web