सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्या 4 व्यक्तींविरुध्द गुन्हे दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या व निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्या अशा एकुण 4 व्यक्तींविरुध्द वाशी पो.ठा. व बेंबळी पो.ठा. यांनी दि. 23.01.2022 रोजी कारवाया केल्या.

यात दिनेशी चौधरी यांनी वाशी योथील आपल्या जलेबी सेंटरवर तर विनोद प्रजापती यांनी नागेवाडी चौकातील आपल्या हातगाड्यावर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केल्याचे तर नितीन सानप, रा. परमेश्वर, ता. भुम यांनी सरमकुंडी फाटा येथील सार्वजनिक रस्त्यावर क्रुझर वाहन क्र. एम.एच. 25 आर 3827 हे रहदारीस धोकादायकपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असल्याचे वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

            तसेच आकाश कोरे, रा. नांदुर्गा, ता. उस्मानाबाद यांनी करजखेडा – उजणी रस्त्यावर ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 25 एफ 1002 हा रहदारीस धोकादायकपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असल्याचे बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.

हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

शिराढोन : कळंब तालुक्यातील खामसवाडी ग्रामस्थ- अजिंक्य व्यंकट बंडगर यांच्या शेतातून गावकरी- दत्तात्रय नागनाथ हिरे यांनी विद्युत वायर नेल्याने यातून त्या शेतातील आंब्यांच्या झाडाचे फांटे तुटल्याने या कारणावरुन अजिंक्य बंडगर यांसह त्यांच्या कुटूंबातील नितीन, गणेश, सुरेश, शकुंतला या सर्वांनी दि. 21.01.2022 रोजी 09.20 वा. सु. खामसवाडी शिवारात दत्तात्रय हिरे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दत्तात्रय हिरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : वाखरवाडी, ता. उस्मानाबाद येथील नवनाथ व दिलीप अंकुश सुरवसे हे दोघे भाऊ असून नवनाथ सुरवसे यांनी आपल्या नावावरील एक हेक्टर शेतजमीन विक्री केली. या रागातून भाऊ- दिलीप सुरवसे यांसह पिता- अंकुश सुरवसे, पुतण्या- राजपाल व राजकुमार यांनी नवनाथ सुरवसे यांना दि. 23.01.2022 रोजी 08.00 वा. सु. गावातील जि.प. शाळेजवळ शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नवनाथ सुरवसे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web