न्यायालयीन कागदपत्रांमध्ये फेरफार : भैरवनाथ शुगरच्या वरिष्ठ कारकूनावावर गुन्हा दाखल 

 
Osmanabad police

परंडा  :  परंडा येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. चे वरिष्ठ कारकून सतीश शंकर देशमुख, रा. परंडा यांनी दि. 25.05.2012 ते 22.02.2019 दरम्यान दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) परंडा येथे दाखल असलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये न्यायालयाच्या परवानगीशिवाय खाडाखोड करुन मजकुरात फेरफार केला. यावरुन नमूद न्यायालयातील सहायक अधीक्षक- श्री. विश्वनाथ मारवाडकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 466, 468, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवलाआहे.

 
चोरी

उस्मानाबाद : वाकडी, ता. परंडा ग्रामस्थ- सुग्रीव शेकर लोकरे यांच्या गट क्र. 387 /1 मधील शेत विहीरीवरील सौर ऊर्जाचलीत 3 अश्वशक्ती क्षमतेचा एल & टी पानबुडी पंप दि. 03- 04.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.

            दुसऱ्या घटनेत ढोकी ग्रामस्थ- झुंबर लक्ष्मण कसबे यांच्या बोरगाव शिवारातील शेत गट क्र. 32 मधील विहीरीवरील 5 अश्वशक्ती क्षमतेचा लक्ष्मी मोनोब्लॉक विद्युत पंप दि. 22- 23.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.

            अशा मजकुराच्या सुग्रीव लोकरे व झुंबर कसबे यांनी दि. 26 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत परंडा व शिराढोन पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

तुळजापूर  : एसटी कॉलनी, तुळजापूर येथील लक्ष्मीकांत शिंदे यांची हिरो आय स्मार्ट मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एई 8732 ही दि. 21- 22.11.2021 दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या लक्ष्मीकांत शिंदे यांनी दि. 26 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web