येरमाळ्यात जनावरांच्या चोऱ्या वाढल्या 

 
crime

येरमाळा  : फिर्यादी नामे- बाळासाहेब जगन्नाथ भातलवंडे, वय 50 वर्षे, रा.बाभळगाव, ता. कळंब जि. धाराशिव यांचे बाभळगाव शिवारातील शेतातील गोठ्यात बांधलेले 2 बैल अंदाजे 62,000₹ किंमतीचे तसेच बाळासाहेब भातलवंडे यांचे शेताचे शेजारील रामकिसन गणपती जगताप यांचे शेतातील गोठ्यात बांधलेली एक गाय व एक वासरु असा एकुण 1,17,000₹ किंमतीची जनावरे हे दि.04.09.2023 रोजी 20.00 ते दि. 05.09.2023 रोजी 05.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी बाळासाहेब भातलवंडे यांनी दि.19.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 धाराशिव  : फिर्यादी नामे- अजित फुलचंद राठोड, वय 34 वर्षे, रा.बालाजी नगर शेकापूर रोड, धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची होन्डा कंपनीची सिबी युनिकॉर्न ग्रे कलरची मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 6281 ही दि. 17.09.2023 रोजी 21.30 ते दि. 18.09.2023 रोजी 05.45 वा. सु. अजित राठोड यांचे राहत्या घराचे समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी अजित राठोड यांनी दि.19.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web