भाऊसाहेब  बिराजदार साखर कारखान्याची फसवणूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल 

 
crime

लोहारा : तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब  बिराजदार साखर कारखान्यास ऊस वाहतूक करण्याचा करार करून, १८ लाख उचल घेऊन फसवणूक करणाऱ्या तीन जणांवर लोहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी नामे-1)प्रकाश दामु राठोड, 2) संजय सुरेश चव्हाण 3) अभिजीत सिताराम राठोड सर्व रा. दुधणी ता. अक्कलकोट जि. सोलापूर यांनी दि.24.06.2022 रोजी पासून ते आज पावेतो समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या परिसरात  मौजे दुधणी ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथे क्युनर्जी इंडस्ट्रीज लि. संचलित भाऊसाहेब  बिराजदार साखर कारखाना समुद्राळ त्यांच्या मालकीच्या वाहनात ऊस वाहतुक करतो म्हणून करार केला होता . 

नमुद कारखान्याकडून तिन्ही आरोपीतांनी मिळून 18,00,000 ₹ घेतले व उस वाहतुक करण्यास आले नाहीत.  कारखान्याचे अधिकारी वसुलीसाठी गेले असता नमुद आरोपीतांनी 3,80,000₹ कारखान्याचे खातेवर जमा केले व उर्वरीत 14,20,000₹  वसुलीसाठी कारखान्याचे वसुली अधिकारी व कर्मचारी गेले असता नमुद आरोपीतांनी तुमचे पैसे देणार नाही असे म्हणून कारखानृयाचे अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

भाऊसाहेब  बिराजदार साखर कारखान्याची 14,20,000 ₹ पैसे न देता फसवणूक केली आहे. अशी फिर्यादी माधव व्यंकटराव पाटील, वय 33 वर्षे, रा. जकेकुर, ता. उमरगा जि. उस्मानाबाद, व्यवसाय- वसुली अधिकारी क्युनर्जी इंडस्ट्रीज लि. संचलित भाउसाहेब बिराजदार साखर कारखाना समुद्राळ यांनी दि.27.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

   
महिलेस मारहाण करणाऱ्या सहा जणांवर  गुन्हा दाखल 

लोहारा  : आरोपी नामे-1)कमलाबाई शिवाजी गुळवे, 2) ज्योती शिवाजी गुळवे, 3) नाना वामन शिंदे,4) वामन सोपान शिंदे, 5)व्यंकट सोपान शिंदे,6) विजय शिवाजी गुळवे  सर्व रा.बेलवाडा ता. लोहारा ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.24.08.2023 रोजी 04.30 वा. सु. गावातील मसोबा मंदीरासमोर बेलवाडी येथे फिर्यादी नामे- निमाला प्रभाकर शिंदे, वय 45 वर्षे रा. बेलवाडी,ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांना मागील भांडणाची कुरापत काढून नमुद आरोपीतांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन जखमी केले. तसेच कोंबड्याला औषध टाकुन जसे मारले तसे मारीन असे म्हणून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी निर्मला शिंदे यांनी दि.27.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 148, 149, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web