आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
crime

लोहारा  : कास्ती खुर्द, ता. लोहारा जि. उस्मानाबाद येथील- दत्तु आबाराव जाधव वय 69 वर्षे यांनी शेत रस्त्याचे जाण्या येण्याचे कारणावरुन दि.05.08.2023 रोजी  18.00 वा. सु. ते 06.08.2023 रोजी 13.00 वा. सु कास्ती शिवारात गट नं 198 मध्ये आत्महत्या केली. आरोपी नामे- नामदेव विष्णु गोरे, रा. कास्ती खुर्द, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद यांच्या वेळोवेळी होत असलेल्या जाचास व त्रासास कंटाळून दत्तु जाधव यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मीनाबाई दत्तु जाधव यांनी दि. 07.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन  लोहारा पो.ठाणे भा.दं.वि.सं. कलम- 306, 341, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अवैध गुटखा विक्री करणाऱ्याकर गुन्हा दाखल

कळंब  :कल्पनानगर, कळंब येथील- विजय आण्णासाहेब पारवे, वय 27 वर्षे हे दि. 07.08.2023 रोजी 19.45 वा. सु. माउली हॉटेल समोरील शिव पानटपरीमध्ये रंगिला चौक कळंब येथे अंदाजे 1,654 रु किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला सुगंधित पान मसाला, तंबाकु, माणिकचंद पान मसाला, विमल पान मसाला पुड्या, गोवा गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेले कळंब पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी प्रतिबंधीत गुटखा व तत्सम पदार्थासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द. सं. कलम- 188, 272, 273  अंतर्गत कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web