निर्दयपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्यावर तुळजापुरात गुन्हा दाखल

 
Osmanabad police

तुळजापूर :  वडगांव (गांजा), ता. लोहारा येथील 1) शाम गिराम 2) सुभाष फुलसुंदर 3 )जमीर शेख हे तीघे दि. 22 सप्टेंबर रोजी सांगवी (मार्डी) येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 लगत एका महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम.एच. 07- 4976 मधून क्षमतेपेक्षा जास्त जनावरे दाटीवाटीने भरून त्यांच्या चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने त्यांची वाहतुक करत असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.


 तसेच ते तिघे जनावरांच्या मालकी- ताबा यांविषयी कोणत्याही कागदपत्राची पुर्तता करुशकले नाहीत. यावरुन तुळजापूर पो.ठा. चे पोहेकॉ- जयप्रकाश गलांडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन प्राण्यांना क्रुरतेने वागणुकीस प्रतिबंध अधिनियम कलम- 11 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 119 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

तामलवाडी : ईम्रान इसुफ मुनको, रा. सोलापूर व महादेव शिवाजी कोरेकर, रा. सांगवी (काटी), ता. तुळजापूर या दोघांनी दि. 22 सप्टेंबर रोजी 15.00 वा. सु. तामलवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावर क्र. 52 वर आपापल्या ताब्यातील ऑटोरिक्षा रहदारीस धोकादायकपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web