बुरुडवाडी : गोठ्यास आग लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल
भूम : बुरुडवाडी, ता. भुम येथील जनार्धन व खेलाजी मिटु कोकरे हे दोघे भाऊ पिता- मिटु महादेव यांच्याशी शेत वाटणीतून वाद घालत असत. याच वादातून दि. 10- 11.11.2021 दरम्यानच्या रात्री नमूद दोघा भावांनी आई- वडीलांना शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन शेतातील गोठ्यास आग लावली. या आगीत गोठ्यातील खत, धान्य, टारपोलीन, कपडे इत्यादी साहित्य जळाल्याने मिटु कोकरे यांचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या मिटु कोकरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाणीचे दोन गुन्हे दाखल
उस्मानाबाद : सुलतानपुरा, उस्मानाबाद येथील शमशाद रफीक शेख व रईसा रशीद शेख या दोन्ही कुटूंबीयांतील पुर्वापार वादातून दि. 09.11.2021 रोजी 18.30 वा. सु. दोन्ही गटात गल्लीत हानामाऱ्या झाल्या. यात दोन्ही गटातील सदस्यांनी परस्पर विरोधी गटातील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान केली. यावेळी रईसा शेख यांच्या गटाने शमशाद शेख यांच्या घरासमोर रचलेल्या 12,000 विटा खोद काम ट्रॅक्टरने फोडल्या.
अशा मजकुराच्या शमशाद शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन 4 व्यक्तींविरुध्द तर रईसा शेख यांच्या प्रथम खबरेवरुन 3 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 427, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.
वाशी : शेंडी येथील हिराबाई संतोष पवार व शिवाजी श्रीमंत गोरे या दोन्ही कुटूंबीयांत पुर्वापार वाद असल्याने दोन्ही गटांत दि. 08.11.2021 रोजी 19.30 वा. सु. गावात हानामाऱ्या झाल्या. यावेळी दोन्ही गटातील सदस्यांनी परस्पर विरोधी गटातील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान केल्याने दोन्ही गटातील सदस्य जखमी होउन शिवाजी गोरे यांचे दोन दात पडले.
यावरुन हिराबाई पवार यांनी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन 4 व्यक्तींविरुध्द तर शिवाजी गोरे यांच्या प्रथम खबरेवरुन 8 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 452, 324, 325, 504, 506, 143, 34 अंतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.