धाराशिवमध्ये घरफोडी, सोन्या - चांदीचे दागिने लंपास 

 
crime

धाराशिव  : फिर्यादी नामे- श्रीहरी किसन मोरे, वय 64 वर्षे, रा. सुर्या कॉलनी,  राजीव गांधी  नगर उस्मानाबाद जि. उस्मानाबाद यांचे राहाते घराच्च्या पाठीमागील खिडकीची ग्रिल अज्ञात व्यक्तीने दि.03.08.2023 रोजी 23.00 ते दि.04.08.2023 रोजी 05.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील  मधील 35 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे, चांदीचे चैन 40 ग्रॅम वजनाची, पितळी समई 2 व रोख रक्कम 30,500 ₹असा एकुण 1,14,200 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या श्रीहरी मोरे यांनी दि.04.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : फिर्यादी नामे- संजय हरीभाउ शेंडगे, वय 32 वर्षे रा. ढेकरी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 28,000₹ किंमतीची होंडा शाईन मोटरसायकल क्र एम एच 25 एएन 1016 ही दि.30.07.2023 रोजी 06.00 वा. सु. माउली मंदीरासमोर ढेकरी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संजय शेंडगे यांनी दि.04.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web