तुळजापुरात घरफोडी, सोन्याचे दागिने लंपास  

 
crime

तुळजापूर  : फिर्यादी नामे- गणेश दगडू पवार, वय 53 वर्षे, रा. दिप लक्ष्मी/दिप ज्योती सोसायटी अपसिंगा रोड तुळजापूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांचे राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 31.07.2023 रोजी 12.30 ते 18.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील मिनीगंठण, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, तिन ग्राम व दोन ग्रामची लहान सोन्याच्या अंगठ्या असे एकुण 45 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे एकुण 1,85,000 ₹ किंमतीचा माल हा दि.31.07.2023 रोजी. 12.30 ते 18.00 वा. सु. चोरुन नेला. तसेच शेजारी रेशमा मुस्तफा सय्यद यांचे घराचे पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडुन आत प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या गणेश पवार यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 454, 380, 511 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  :  फिर्यादी नामे- आश्रुबा लिंबराज आडसुळ, वय 26 वर्षे रा. डोंगरेवाडी, ता. वाशी जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 60,000 ₹ किंमतीची एक जर्सी गाय दि.21.07.2023 रोजी 09.00ते दि.22.07.2023 रोजी 06.00 वा. सु. डोंगरेवाडी, ता. वाशी जि. उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या आश्रुबा आडसुळ यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web