धाराशिवमध्ये घरफोडी, सोन्याचे दागिने लंपास 

 
crime

धाराशिव  : फिर्यादी नामे- सुमन रंगनाथराव नलावडे, वय 80 वर्षे, रा. दत्तनगर, उस्मानाबाद यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.11.07.2023 रोजी 18.30 ते दि.12.07.2023 रोजी 08.40 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन 20 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, लक्ष्मी हार 15 ग्रॅम वजनाचे, चांदीचे आरतीचे ताट, दोन आरत्या फुलपात्र व रोख रक्कम 16,000₹ असा एकुण 60,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुमन नलावडे यांनी दि.12.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं. वि. सं. कलम- 380, 454, 457 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
लोहारा  : फिर्यादी नामे-राजु सैपन शेख, वय 33 वर्षे, रा. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, लोहारा जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.सी. 9566 ही दि.25.06.2023 रोजी 22.00 ते 26.06.2023  रोजी 05.00 वा. सु. राजु शेख यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या राजु शेख यांनी दि.12.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो.ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल

 धाराशिव  : आरोपी नामे- तौफीक शफीक कुरेशी, रा खाजानगर, उस्मानाबाद यांनी   दि.10.07.2023 रोजी पुर्वी पिंपरी शिवारातील गट नं 118 व 140 मध्ये पिंपरी शिवारात सिफा बोन मिल ॲड फर्टीलायझर कंपनीमध्ये गोवंश जातीचे इतर पशुधनाची कत्तलपुर्व तपासणी न करता गोवंश जातीचे इतर पशुधनाचे शिर, पाय व इतर अवयवाचा साठा करुन ठेवल्याचे उस्मानाबाद शहर पो.ठाणे च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम- 5(क)(ड) व 9(अ) अन्वये  उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web