लोहारा :  रहदारिस धोकादायकरित्या वाहन- ढकल गाडे उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
Osmanabad police

लोहारा : सार्वजनिक रस्त्यावर रहदारिस धोकादायकरित्या वाहन- ढकल गाडे उभे करणाऱ्या तसेच वाहतुक करणाऱ्या 4 चालकांविरुध्द लोहारा पोलीसांनी दि. 23.11.2021 रोजी भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत खालीलप्रमाणे 4 गुन्हे नोंदवले आहेत.

यात 1) इमाम महेबुब शेख, रा. लोहार यांनी बसस्थानक, लोहारा समोरील रस्त्यावर ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 25 बी 1327 हा उभा केला. 2) शब्बीर अलीशेर बागवान यांनी लोहारा येथील रस्त्यावर फळगाडा उभा केला. 3) पांडुरंग मनोहर कलंकधर, रा. नळदुर्ग यांनी जेवळी बस थांबा चौकातील रस्त्याने ॲपेरिक्षामध्ये भाजीपाल्याचे गाठोडे तसेच प्रवासी भरुन धोकादायकरित्या वाहतुक केली. 4) शहनवाज शेख, रा. सास्तुर हे गावातील सार्वजनिक रस्त्यावर ॲपेरिक्षा क्र. एम.एच. 25 एन 847 हा उभा केला होता.

 अपघात

उस्मानाबाद  : राजेंद्र वाघमारे, रा. विजयनगर, उस्मानाबाद हे दि. 18.11.2021 रोजी 18.30 वा. सु. परिसरातील महामार्गाने पायी चालत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. केए 01 एजे 9859 हि निष्काळजीपने चालवून वाघमारे यांना समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या विनोद राजेंद्र वाघमारे यांनी दि. 23 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web