लोहारा : अवैध गुटखा बाळगला गुन्हा दाखल

 
Osmanabad police

लोहारा  : जेवळी, ता. लोहारा ग्रामस्थ- माळाप्पा बाबुराव रायभोगे यांनी गावातील ‘रायभोगे किराणा स्टोअर्स’ मध्ये 1,650 ₹ किंमतीचा तंबाखुजन्य पानमसाला हा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्नपदार्थ दि. 26.11.2021 रोजी 19.30 वा. सु.बाळगले असतांना लोहारा पोलीसांना आढळले. यावरुन लोहारा पो.ठा. चे पोलीस कॉन्स्टेबल- प्रशांत शेळवणे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबेरवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
धोकादायकरित्या अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल

उमरगा : अजिम महंमद चौधरी, रा. काळे प्लॉट, उमरगा हे दि. 26.11.2021 रोजी 21.00 वा. सु. उमरगा चौरस्ता येथील त्यांच्या हॉटेलमध्ये मानवी जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपने शेगडीवर अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.


पाहिजे आरोपी अटकेत

बेंबळी : बेंबळी पो.ठा. चे प्रभारी सपोनि- श्री. शेंडगे यांसह पोहेकॉ- घोडके, पोना- कपाळे, इगवे, पोशि- गुरव यांचे पथक विविध गुन्ह्यातील पाहिजे / फरारी आरोपी शोधार्थ दि. 26.11.2021 रोजी गस्तीस होते. यावेळी गुन्हा क्र. 29 / 2020 व 92 / 2021 या चोरीच्या गुन्ह्यातील तसेच इतर 4 गुन्ह्यातील अटक वॉरंटमधील आरोपी- रवी टल्लींग्या पवार हा गावी परतला असल्याची पथकास माहिती मिळाली असता पथकाने त्यास तात्काळ अटक केले.

From around the web