भाटशिरपुरा :  बुलेटला कारची धडक , एक ठार 

 
crime

शिराढोण  : मयत नामे- अंकुश उत्तमराव गायकवाड, वय 46 वर्षे, रा. भाटशिरपुरा, ता. कळंब जि. उस्मानाबाद हे दि. 11.09.2023 रोजी 08.30 वा. सु. ढोकी ते कळंब जाणारे रोडवर मंगरुळ शिवारामध्ये साईराज बार चे समोरुन बुलेट मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 4147 वरुन गावी भाटशिवार येथे जात होते. 

दरम्यान इटीओस कंपनीची कार  क्र एमएच 25 झेड 8584 चे चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून चुकिच्या दिशेने येवून अंकुश गायकवाड यांचे बुलेट मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या आपघातात अंकुश गायकवाड हे गंभीर जखमी होवुन मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी ऋषीकेश अंकुश गायकवाड, रा. भाटशिरपुरा ता. कळंब जि. उस्मानाबाद यांनी दि.14.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यांवर गुन्हा नोंद

लोहारा :आरोपी नामे-1) विनोद दिनकर जावळे पाटील, रा. नागुर, ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांनी दि.12.09.2023 रोजी 12.00 ते 12.30 वा. सु. शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय लोहारा येथे फिर्यादी नामे- डॉ. शेषेराव शंकरराव जावळे, वय 56 वर्षे, व्यवसाय (प्राचार्य) शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय लोहारा ह.मु. उस्मानाबाद हे सरकारी काम करत असताना नमुद आरोपीने सदर ठिकाणी येवून  कॉलेजच्या शेड दुरुस्तीचे काम चालु असताना फिर्यादीयास व कामावर असलेले मजुर यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच शासकिय काम पार पाडण्यास अडथळा निर्माण केला. यावरुन डॉ शेषेराव जावळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 353, 332, 323, 504अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web