बेंबळी - अवैध सावकारी प्रकरणी  एकावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

बेंबळी  : श्रीरंग मुंडे, रा. बोरखेडा यांनी गटक क्र. 451 मधील 81 आर जमीन 5,00,000 ₹ रकमेच्या मोबदल्यात कनगरा, ता. उस्मानाबाद येथील देवानंद उत्तम दळवे यांना खरेदी करुन दिली व ती जमीन 100 ₹ च्या स्टँप पेपरवर परत द्यायची ठरले होते. परंतु देवानंद दळवे यांनी ठरलेल्या रकमे ऐवजी 14,00,000 ₹ रक्कम मागीतली. 

याप्रकरणी श्रीरंग मुंडे यांचा मुलगा- श्रीहरी मुंडे यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद यांच्या कार्यालयास अर्ज सादर केला होता. याच्या चौकशीदरम्यान सावकारी झाल्याचे निष्पन्न झाल्यावरुन सहायक निबंधक- श्रीमती- वर्षा भोसले यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम- 39 अंतर्गत बेंबळी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

पोलीसांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

उस्मानाबाद - पोलीस ठाणे : घाटंग्री रस्त्यालगत हातलाई डोंगराच्या पायथ्याशी अवैध मद्य विक्री चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे सपोनि- श्री. शंकर सुर्वे हे पथकासह दि. 06 ऑक्टोबर रोजी  18.45 वा. नमूद ठिकाणी कारवाईकामी गेले. यावेळी तेथे उपस्थित असेल्या कुंदन युवराज पवार, सुरेखा कुंदन पवार, किरण अनिल काळे, तीघे रा. हातलाई डोंगर पायथा यांनी पोलीस पथकास शिवीगाळ करुन हातात काठी घेउन अंगावर धावून येउन ठार मारण्याची धमकी‍ दिली. अशा प्रकारे नमूद तीघांनी पोलीसांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन सपोनि- श्री. शंकर सुर्वे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 294, 504, 506, 184, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

वाशी  : आंद्रुड, ता. भुम येथील ग्रामस्थ- मिना दिलीप ओव्हळ व श्रीरंग भगवान ओव्हळ हे दोघे दि. 06 ऑक्टोर रोजी 10.30 वा. सु. आंद्रुड गट कम्र. 652 मधील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या भुखंडावर अतिक्रमण करुन पत्रा शेड बांधत होते. यावेळी ग्रामसेवक- रमेश मुंढे यांनी त्यांना हाटकले असता त्या दोघांनी खोटी केस करण्याची मुंढे यांना धमकी दिली. यावरुन रमेश मुंढे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 447, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web