बेंबळी : अवैध गोवंशीय जनावराचे मांस वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
धाराशिव - पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात गोवंशीय जणावराची होणारी अवैध वाहतुक व कत्तल यावर कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने बेंबळी पोलीस ठाण्याचे पथक दि. 18.08.2023 रोजी 00.30 वा.सु. पो.ठा. हद्दीत चिखली चौरस्ता ता.जि. उस्मानाबाद येथे नाकाबंदी करत होते. दरम्यान चिखली चौरस्ता रोडवरुन एक आयशर टेम्पो क्र. एम.एच. 25 एजे 0947 येत असताना पथकास दिसल्याने पथकाने त्यास थांबण्यास सागिंतले. पथकाने संशयावरून चालकास विचारपुस केली असता त्याने आपले नाव- सद्दाम गौसोद्दीन कुरेशी, वय 31 वर्षे रा. वाढवणा बु. ता. उदगीर जि. लातुर, 2) आसिफ नबीलाल शेख रा. कांदलगाव ता. इंदापूर जि. पुणे असे सागिंतले.
टेम्पोतून दुर्गंधयुक्त पाणी गळत असल्याने पथकाने संशयावरून टेम्पोचे पाठीमागे हौद्यात डोकावून पाहिले असता आत गोवंशीय जनावराचे गोमांस दिसून आले. यावर पोलीसांनी नमूद टेम्पो चालकास त्या मांस वाहतुक परवाण्याबाबत विचारले असता परवाना नसल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पथकाने अंदाजे 8,00,000 ₹ किंमतीच्या नमूद टेम्पोसह त्यातील अंदाजे 3,75,000 ₹ किंमतीचे सुमारे 2.5 टन गोवंशीय जनावरांच्या मांस असा एकुण 11,75,000 ₹ गोवंशीय मांस जप्त केले. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार- सचिन कोळी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5(क), 9 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली बेंबळी पोलीस ठाण्याचे प्रभारी- श्री. शिंदे, पोउपनि श्री. माने, पोलीस नाईक- एस बी साखरे, पोलीस अंमलदार- एस बी कोळी, सदावर्ते, मस्के यांचे पथकांनी केली आहे.