धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई 

 
crime

लोहारा :  जेवळी पुर्व तांडा, ता. लोहारा जि. उस्मानाबाद आरोपी नामे 1 ) रवी अनिल जाधव, वय 28 वर्षे, हे दि.14.08.2023 रोजी 17.30 वा. सु.गावालगत असणारे जेवळी पुर्व तांडा येथे अंदाजे 12,000₹ किंमतीची 100 लि. गावठी दारु विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगेलेली जप्त करण्यात आली. तर सास्तुर, ता.  लोहारा जि. उस्मानाबाद आरोपी नामे- बाबासाहेब उग्रसेन गायकवाड, वय 40 वर्षे,  हे याच दिवशी 17.30 वा. सु. सास्तुर आठवडी बाजार काट्याजवळ सास्तुर येथे अंदाजे 1,080 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 27 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगेलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये लोहारा पोठा येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.

 
वाशी  :  शिवाजी नगर, वाशी जि. उस्मानाबाद येथील-ताई संजय पवार, वय 45 वर्षे, हे दि.13.08.2023 रोजी 16.30 वा. सु. शिवाजी नगर तांदुळवाडी रोड वाशी लगत आरोपीच्या राहते घरासमोर अंदाजे 85,000 ₹ किंमतीचे 1000 लि. गावठी दारु निर्मीतीचे रासायनिक द्रव व 50 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगेलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये वाशी पोठा येथे गुन्हा नोंदविला आहे.

धाराशिव :  काकानगर सांजा, ता.जि. उस्मानाबाद येथील-सगिंता छगन काळे, या दि. 14.08.2023 रोजी 19.00 वा. सु. काकानगर सांजा येथे आपल्या राहत्या घरा समोर अंदाजे 1,050 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगेलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये आनंदनगर पोठा येथे गुन्हा नोंदविला आहे.

जुगार विरोधी कारवाई

उमरगा : जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.14.08.2023 रोजी 13.30  वा. सु. उमरगा पो.ठा. हद्दीत  एकुरगा येथील समाज मंदीर शेजारी रोडवर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे -1) बलभिम तुकाराम कांबळे, वय 38 वर्षे, रा.एकुरगा ता. उमरगा  जि. उस्मानाबाद, हे एकुरगा समाज मंदीर शेजारी रोडवर श्रीदेवी मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,790 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पोठा येथे  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web