धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई 

 
crime

तुळजापूर  : आरोपी नामे- 1) राजेंद्र दत्तु झाडे, वय 57 वर्षे रा. काक्रंबा, ता तुळजापूर जि. उस्मानाबाद हे दि 10.08.2023 रोजी 17.30 वा. सु. काक्रंबा येथील धारुळ रोड लगत अंदाजे 910 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर आरोपी नामे- 2) प्रकाश धनाजी कांबळे, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे याच दिाशी 19.00 वा. सु. सिंदफळ झोपडपट्टी येथे अंदाजे 1,200₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळबलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये तुळजापूर पोठा येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.

शिराढोण  : आरोपी नामे- 1) दर्शना बालाजी कसबे, वय 35 वर्षे रा. वडगाव, ता. कळंब जि. उस्मानाबाद या दि 11.08.2023 रोजी 11.30 वा. सु.वडगाव गावात जाणारे रोडचे बाजूला पत्रयाचे शेडलगत अंदाजे 600 ₹ किंमतीच्या 10 लि. गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या, तर आरोपी नामे- 2) शोभा बापु एडके, वय 45 वर्षे, रा.वडगाव ता. कळंब जि. उस्मानाबाद या याच दिाशी 11.30 वा. सु. वडगाव ते वाठवडा गावात जाणारे रोडचे बाजूला पत्रयाचे शेडलगत अंदाजे 960 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या  अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळबलेल्या आढळल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये शिराढोण पोठा येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.

नळदुर्ग  : आरोपी नामे- 1) पुष्पाबाई फुलचंद बनपट्टे  वय 65 वर्ष रा.अणदुर, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद या दि 11.08.2023 रोजी 14.10 वा. सु. आपल्या गावातील राहत्या घरासमोर अंदाजे 4,000 ₹ किंमतीची 40 लि गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या आढळल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये नळदुर्ग पोठा येथे गुन्हे नोंदविला आहे.

येरमाळा  : आरोपी नामे- 1) विकास तुकाराम कळसाईन  वय 36 वर्ष रा.येरमाळा ता. कळंब जि. उस्मानाबाद हे दि 11.08.2023 रोजी 20.30 वा. सु. गुरुकृपा भांडी सेंन्टर दुकानाच्या बाजूला येरमाळा येथे अंदाजे 700 ₹ किंमतीच्या 10 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये येरमाळा पोठा येथे गुन्हे नोंदविला आहे.

From around the web