उस्मानाबाद नऊ ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई

 
Osmanabad police

उस्मानाबाद : अवैध मद्य विरोधी कारवाईदरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि. 10.12.2021 रोजी 9 ठिकाणी छापे मारुन महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम अंतर्गत खालीलप्रमाणे 9 गुन्हे नोंदवले आहेत.

1) उमरगा पोलीसांनी पळसगांव तांडा येथील साठवण तलाव परिसरात 3 ठिकाणी छापे मारले असता यावेळी ग्रामस्थ- 1)संजु राठोड 2)पिंटु राठोड 3)गोपीनाथ राठोड 4)राजु राठोड 5)मोहन चव्हाण 6)आबु राठोड हे सर्वजन  हातभट्टी निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा द्रव पदार्थ बाळगलेले असतांना आढळले.

2) कळंब पोलीसांनी 2 ठिकाणी छापे मारले असता यात शेळी बाजार मैदान, कळंब येथील तोळाबाई पवार या 19 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या तर पिंपळगाव (डोळा), ता. कळंब ग्रामस्थ- संतोष टेकाळे हे गावातील भाटशिरपुरा रस्त्यालगत 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना आढळले.

3) इंदीरानगर, उस्मानाबाद येथील रामा चव्हाण हे राहत्या परिसरात एका कॅनमध्ये 14 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळले.

4) आसु, ता. परंडा येथील मोहन पवार हे गावातील कॅनॉललगतच्या एका शेडजवळ देशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या व 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

5) सास्तुर, ता. लोहारा येथील बाबासाहेब गायकवाड हे गावातील साप्ताहीक बाजार परिसरात देशी दारुच्या 24 सिलबंद बाटल्या बाळगलेले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

6) सरमकुंडी, ता. वाशी येथील अर्जुन गायकवाड हे गिरवली फाटा येथील ‘राजधानी हॉटेल’ मध्ये 180 मि.ली. क्षमतेच्या 20 बाटल्या देशी- विदेशी दारु बाळगलेले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

जुगार विरोधी कारवाई

लोहारा  : अफजल तांबोळी, रा. पेटसांगवी, ता. उमरगा हे दि. 09.12.2021 रोजी 21.30 वा. सु. गाव वेशीतील एका हॉटेलमध्ये मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 745 ₹ रक्कम बाळगलेले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web