धाराशिवच्या तेरणा बँकेत आणखी एक घोटाळा
भूम : तेरणा नागरी सहकारी बॅक लि. उस्मानाबाद शाखा भुम चे व्यवस्थापक किशोर विठ्ठल भोरे, तर गुजर गल्ली, कसबा पेठ, भुम येथील- सोनार- माधव चंद्रकांत वेदपाठक, तर आष्टावाडी, ता. भुम येथील- गणेश पंडीत डिसले, तर गालीब नगर भुम येथील-प्रविण भागवान शिंदे, कसबा पेठ, भुम येथील-पल्लवी महादेव वेदपाठक, चंद्रकांत दत्तात्रय वेदपाठक, तर रविंद्र प्राथमिक शाळा भुम येथील- माया सुखदेव कांबळे, तर भुम येथील- सुजितसिंह महादेव पाटील यांनी दि. 10.04.2023 रोजी 12.15 पुर्वी तेरणा नागरी सहकारी बॅक लि. उस्मानाबाद शाखा भुम येथे संगणमत करुन सोने धातु नसलेले दागीने सोने आहे असे बॅकेस भासवुन व तसे लेखी अहवाला मध्ये नमूद करुन स्वत:चे फायद्यासाठी व बॅकेचे नुकसान व्हावे या उद्देशाने बॅकेचा विश्वासघात करुन एकुण 41,09,434 एवढे सोने तारण कर्ज म्हणून बनावट धातु तारण ठेवून कर्ज उचलून बॅकेची फसवणुक केली. अशा मजकुराच्या तेरणा नागरी सहकारी बॅक मुख्य शाखा उस्मानाबाद येथील- वसुली अधिकारी- विलास शिवदास पडवळ यांनी दि. 09.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 409, 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.