अणदूर : १५ व्या वर्षी लग्न, १६ व्या वर्षी मातृत्व ठरले जीवघेणे 

तब्बल 10 दिवसानी नळदुर्ग पोलिसात बालविवाह कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल 
 
s

नळदुर्ग  - बालविवाह कायद्याला झुगारून अणदूर येथील  एका 15 वर्षीय मुलीचा विवाह गतवर्षी करण्यात आला होता, लग्नानंतर 16 व्या वर्षी या मुलीला मातृत्व, आले पण बाळंतपणात तिचा मृत्यू झाला आहे. घटना घडल्यानंतर दहा दिवसांनी  या प्रकरणी वर आणि वधू कुटुंबातील लोकांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह उस्मानाबाद तालुक्यातील उत्तमी कायापुर येथील अजित बोंदर या 28 वर्षीय तरुणाशी करण्यात आला होता.कोरोना काळात 11 जून 2020 रोजी या दोघांचा विवाह सोहळा उत्तमी कायापुर येथे पार पडला ,त्यानंतर अवघ्या वर्षभराच्या आतच सदरील मुलगी  गरोदर राहिली.7ऑक्टोंबर रोजी तिला बाळंतपणासाठी उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र 13 ऑक्टोंबर रोजी अशक्तपणामुळे तिला सोलापूर येथे हलवण्यात आले. 

यादरम्यान तिचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला 14 ऑक्टोंबर रोजी तिचे सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली मात्र 15 ऑक्‍टोबर रोजी या अल्पवयीन मातेच्या निधन झालं कमी वयात लग्न केल्याने आणि मातृत्व आल्याने एका मुलीचा मृत्यू झाला त्यामुळे या प्रकरणी मुलीचे (वडील) भारत घुगे,(आई) चंद्रकलाबाई घुगे (मुलीचे काका) लक्ष्मण घुगे,राम घुगे तर (पती) अजित बोंदर,(सासू) जनाबाई बोंदर,(सासरा) धनराज बोंदर आणि (मुलीची मावशी) सुरेखा बोंदर यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 गुन्हा रजिस्टर नंबर 00/2021 9.10.11. कलमान्वये ग्रामसेवक देविदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल

अणदूर येथील प्रतिक्षा या मुलीचे वय 15.4 वर्षे असतांनाही तीचे माता- पिता चंद्रकला व भरत घुगे यांनी तीचा विवाह उतमी (कायापूर) येथील जनाबाई व धनराज बोंदर  यांचा मुलगा- अजित, वय 28 वर्षे याच्या सोबत दि. 11.06.2020 रोजी लावला. प्रतिक्षा ही अल्पवयीन असल्याचे माहित असुनही जाणीवपुर्वक हा बालविवाह संपन्न करणाऱ्या वर नमूद पाच व्यक्तींसह लक्ष्मण घुगे, राम घुगे, सुरेखा बोंदर अशा आठ व्यक्तीं विरुध्द ग्राम विकास अधिकारी- देविदास चव्हाण यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम- 9, 10, 11 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. नमूद गुन्हा पुढील तपासास उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे.

From around the web