तुळजापूर तालुक्यात १८ वर्षीय तरुणीचा ६५ वर्षीय वृद्धाकडून लैंगिक छळ

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : तुळजापूर तालुक्यातील एक 18 वर्षीय तरुणी (नाव- गाव गोपनीय) दि. 10.01.2022 रोजी 11.30 वा. सु. आपल्या घरी एकटी असतांना नात्यातीलच एका 65 वर्षीय पुरुषाने कुऱ्हाडीचा धाक दाखवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीच्यासह तीच्या आईस ठार मारण्याची धमकी तीला दिली . अशा मजकुराच्या पिडीत तरुणीने दि. 13.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


१३ वर्षीय मुलीचे अपहरण 

उस्मानाबाद  : “मैत्रीणीकडे अभ्यासाला जाते.” असे कुटूंबीयांस सांगून दि. 12.01.2022 रोजी 20.00 वा. सु. घराबाहेर पडलेली एक 13 वर्षीय मुलगी (नाव-  गाव गोपनीय) परत घरी न परतल्याने कुटूंबीयांनी तीचा परिसरात, तीच्या मैत्रीणीकडे शोध घेतला असता शेजारील गावच्या एका तरुणाने तीचे अपहरन केले असल्याचे तीच्या कुटूंबीयास समजले. अशा मजकुराच्या मुलीच्या पित्याने दि. 13 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाणीच्या दोन घटना 

अंबी : कंडारी, ता. परंडा येथील हौसाबाई रेवडकर व नामदेव जाधव हे दोघे दि. 10.01.2022 रोजी 20.00 वा. सु. अनाळा शिवारातील रस्त्याने जात असतांना ग्रामस्थ- बापु संतराम जाधव यांनी पुर्वीच्या वादावरुन नमूद दोघांना अडवून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हौसाबाई रेवडकर यांनी दि. 13 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : चिंचोली, ता. तुळजापूर येथील आकाश ढवळे, आरती ढवळे, बालिका ढवळे यांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 12.01.2022 रोजी 18.00 वा. सु. पुतळाबाई विठ्ठल दनदाडे यांसह त्याच्या सुनेस  त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच नमूद लोकांनी पुतळाबाई यांचे डोके रोडवर आपटून त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या पुतळाबाई यांनी दि. 13 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               
 

From around the web