अंबीत रात्रगस्तीदरम्यान 15 भ्रमणध्वनींसह संशयीत ताब्यात

 
s

उस्मानाबाद : अंबी पो.ठा च्या सपोनि-  आशिष खांडेकर यांसह पोहेकॉ- मुळे, धावडे, पोकॉ- आडसूळ यांचे पथक आज दि. 7 सप्टेंबर रोजी पहाटे रात्रगस्तीस असतांना अंबी येथे एक पुरुष रस्त्यात दिसला. पोलीसांनी त्यास हटकले असता त्याचे नाव सुभाष उत्तम राऊत, रा. खांबेवाडी, ता. करमाळा असल्याचे समजले. संशयावरुन पोलीसांनी त्याच्या पिशवीची झडती घेतली असता आत 14 स्मार्टफोन व 1 फिचर फोन असे एकुण 15 भ्रमणध्वनी आढळले. या भ्रमणध्वनींच्या मालकी- ताबा विषयक तो समाधानकारक माहिती देत नसल्याने त्यास अटक करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 122, 124 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्या भ्रमणध्वनींच्या आयएमईआय क्रमांकाद्वारे मुळ मालकांचा शोध घेतला जाणार असुन या कामी उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्याची मदत घेतली जाणार आहे.   

चोरीच्या तीन घटना 

उस्मानाबाद  : लक्ष्मण त्रंबक नवले, रा. खानापुर, ता. उस्मानाबाद यांच्या बार्शी नाका, उस्मानाबाद येथील चहा टपरीचा कडी- कोयंडा दि. 05- 06 सप्टेंबर रोजीच्या रात्री अज्ञाताने तोडून आतील गॅस शेगडीसह टाकी, भांडी व 500 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
वाशी  : प्रभुलिंग बस्वलिंग भाळवणे, रा. वाशी यांच्या शिवकृता किराणा दुकानाचा पत्रा दि. 05- 06 सप्टेंबर रोजीच्या रात्री अज्ञाताने अचकटून दुकानातील खाद्यतेलाचे 5 डबे व 8 खोकी तसेच खोबरे तेलाच्या 30 बाटल्या असा माल चोरुन नेला. यावरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उमरगा  : पुंडलिक घंटे, रा. एकुरगा, ता. उमरगा यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल ही दि. 31.08.2021 रोजी 19.00 ते 21.00 वा. सु. उमरगा चौरस्ता येथील सुदर्शन उडपी हॉटेल समोर लावली असता ती अज्ञाताने चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web