धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई 

 
crime

धाराशिव - अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि.20.05.2023रोजी जिल्हाभरात एकुण 8 कारवाया केल्या. यात घटनास्थळावर आढळलेली गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 11,40 लि. अंबवलेला द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट नष्ट करण्यात आला तर सुमारे 51 लि. गावठी दारु, सिंधी ताडी अम्ली द्रव 20 लि. सुमारे व देशी- विदेशी दारुच्या एकुण 85 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 88,135 ₹ आहे. यावरुन 8 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 8 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

1)उस्मानाबाद ग्रामीण पोठाच्या पथकास येडशी, ता. उस्मानाबाद येथील- अंजली दत्तात्रय पवार, लताबाई शहाजी पवार  या दोघी 12.10 ते 13.30  वा. सु.येडशी जुन्या रेल्वे स्टेशनच्या रोडलगत  एकुण 1,600 ₹ किंमतीची  25 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या, तर येडशी, ता. उस्मानाबाद येथील- महेश दिलीप हाके, सुरज मोहन भालेराव हे दोघे 14.50 ते 17.40 वा. सु  वेगवेगळ्या दोन ठिकाणी येडशी येथे एकुण 1,660 ₹ किंमतीची 26 गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले  आढळले.

2)उस्मानाबाद  शहर पोठाच्या पथकास झाडे गल्ली, उस्मानाबाद येथील-प्रशांत अरुण इंगळे हे  12.15  वा. सु.जुन्या भारत टॉकीजचे शेजारी  एकुण 1,600 ₹ किंमतीची  20 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, आढळले.

3)नळदुर्ग पोठाच्या पथकास येडोळा तांडा, ता तुळजापूर येथील-  लक्ष्मीबाई प्रकाश आडे  ह्या  06.15  वा. सु.खंडाळा नदीचे पात्रात  एकुण 79,800 ₹ किंमतीची  11,40 लि. गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 11,40 लि. अंबवलेला द्रव पदार्थ अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या आढळल्या.

4)बेंबळी पोठाच्या पथकास कनगरा, ता. उस्मानाबाद येथील-विशाल सतीश दळवे हे 19.30  वा. सु.जुन्या गोलाभाई फार्म हाऊस जवळ आंबेवाडी ते बेंबळी रोडलगत  एकुण 1,225 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या 35 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, आढळले.

5)तुळजापूर पोठाच्या पथकास आपसिंगा, ता. तुळजापूर येथील-दत्तात्रय किसन वडगावकर हे 19.50 वा. सु.आपसिंगा ते तुळजापूर जाणारे रोडलगत  एकुण 2,250 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या 50 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, आढळले

From around the web