धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्य आणि  जुगार विरोधी कारवाई

 
crime

परंडा  : ग्रामस्थ-सज्जन अप्पाराव खर्चे, वय 42 वर्षे, रा. ढगेपिंपरी, ता. परंडा, जि. उस्मानाबाद हे दि 10.07.2023 रोजी 17.40 वा. सु. ढगेपिंपरी येथे शिवाजी किराणा स्टोअर समोर अंदाजे 860 ₹ किंमतीची 09 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये  पंरडा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : ग्रामस्थ- विशाल तात्यासाहेब विर, वय 28 वर्षे, रा. आळणी, ता. जि. उस्मानाबाद हे दि 10.07.2023 रोजी 13.25 वा. सु.आळणी गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,120 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये  पंरडा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई

उमरगा : जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.10.07.2023 रोजी 13.20 वा. सु.. सुर्यवंशी गॅरेजच्या बाजूला उमरगा येथे छापा टाकला आरोपी नामे- भजन वसंत गायकवाड, वय 38 वर्षे, रा. माडज, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद हे सुर्यवंशी गॅरेजच्या बाजूला पत्रयाचे शेडसमोर कल्याण मटका जुगाराचे चालवण्याच्या साहित्यासह 1,110 ₹ रोख रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले, तर आरेपी नामे- 1)राम जगन्नथ जाधव, वय 42 वर्षे, रा. होळी, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद 2) बशीर शेख, रा. हमीद नगर, उमरगा, जि. उस्मानाबाद हे उमरगा बस्थानक जवळ कोकणे फॅब्रीकेशन समोर रोडवर कल्याण मटका जुगाराचे चालवण्याच्या साहित्यासह 10,000 ₹ रोख रक्कम कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो. ठाणे येथे  स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

धाराशिव : जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद ग्रामीण पोलीसांनी दि.10.07.2023 रोजी 15.15 वा. सु. उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. हद्दीत  आळणी छापा टाकला यावेळी आरोपी नामे कृष्णा राजेंद्र सुरवसे  वय 29 वर्षे, रा.आळणी, ता. जि. उस्मानाबाद हे आळणी येथील ग्रामपंचायत चौकामध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 500 ₹ रोख रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत अन्वये उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web